एक सुशिक्षित डॉक्टर अन् तान्ह्या जुळ्या मुलांची आई आणि आत्महत्या??? गूढ काय?

सकाळ वृत्तसेवा 
Saturday, 18 April 2020

म्हसरूळ येथील कन्सरामाता चौकातील कमल स्वीटसमोरील रो-हाउसमध्ये डॉ. विष्णू पालवे पत्नी व आई वडिलांसोबत राहातात. डॉ. पालवे यांच्या पत्नी कोमल यादेखील डॉक्‍टर होत्या. गरोदर असताना त्यांनी काम सोडून दिले होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी दोन जुळ्या मुलांना जन्म दिला.

नाशिक : म्हसरूळ येथील कन्सरामाता चौकातील एका विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली. हा सर्व प्रकार कसा घडला याबाबत नागरिकांमध्ये साशंकता आहे. कारण आत्महत्या करणारी महिला एक सुशिक्षित डॉक्टर अन् जुळ्या तान्हया मुलांची आई होती.

असा घडला प्रकार

म्हसरूळ येथील कन्सरामाता चौकातील कमल स्वीटसमोरील रो-हाउसमध्ये डॉ. विष्णू पालवे पत्नी व आई वडिलांसोबत राहातात. डॉ. पालवे यांच्या पत्नी कोमल यादेखील डॉक्‍टर होत्या. गरोदर असताना त्यांनी काम सोडून दिले होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. प्रसूती वेळेपूर्वी झाल्याने दोन्ही बाळांना काचेच्या पेटीत ठेवण्यात आले होते. शुक्रवारी (ता. 17) रात्री साडेनऊ ते साडेदहाच्या सुमारास पालवे कुटुंबातील सर्व सदस्यांचे जेवण झाले. कोमल या दोन्ही बाळांची दूध बॉटल धुऊन बेडरूमकडे निघून गेल्या. त्याच वेळी फॅनला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. बराच वेळ झाला तरीही कोमल या बेडरूममधून अजून का येत नाही असा प्रश्‍न पडला असता, कुटुंबीय बघावयास गेले. त्यावेळी संबंधित घटना उघडकीस आली. या घटनेने पालवे कुटुंबीय हादरून गेले आहे.  

हेही वाचा > संतापजनक! कोरोनाबाधित रूग्णाचा अंगावर थुंकण्याचा प्रकार..अँम्ब्युलन्स चालकाला मारहाण

VIDEO : जेव्हा विश्वास नांगरे पाटलांना आदेश मिळतो "तुम्ही बाहेर सीपी असाल, पण इथले 'एसीपी' आम्ही आहोत"!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suicide by doctor woman in mhasrul nashik marathi news