HQ assistant arrested while taking bribe nashik crime news 
नाशिक

Nashik Bribe Crime: मुख्यालय सहाय्यक लाच घेताना ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

Nashik Bribe Crime : जमीन मोजायची आहे, मग तीन हजार रुपये द्या, अशी पैशांची मागणी करणारा येथील भूमिअभिलेख कार्यालयातील मुख्यालय सहाय्यक अंजीनाथ बाबूराव रसाळ यास शुक्रवारी (ता. १) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने एक हजार ५०० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. (HQ assistant arrested while taking bribe nashik crime news)

तक्रारदार शेतकऱ्याची वडिलोपार्जित शेती असून, या शेतजमिनीची मोजणी करण्यासाठी रसाळ याने शेतकऱ्याकडे तीन हजार रुपयांची लाच मागितली होती. त्या मागणीच्या तडजोडीअंती एक हजार ५०० रुपये देण्याचे ठरले. त्यानंतर शेतकऱ्याने नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.

या विभागाच्या पथकाने सापळा रचून शुक्रवारी रसाळ यास एक हजार ५०० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. चांदवड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे, हवालदार प्रफुल्ल माळी, सचिन गोसावी यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम, पण नाही मिळाला 'मॅन ऑफ दी मॅच' पुरस्कार; श्रेयस अय्यर काय म्हणाला वाचा...

Birth Certificate Name Change Ban : जन्म-मृत्यू दाखल्यातील पूर्ण नावबदलाला मज्जाव; फक्त मात्रा, स्पेलिंग दुरुस्तीला परवानगी

Tamhini Ghat Closure: ताम्हिणी घाट बंद; दरडी, रस्ता खचल्याने रायगड-पुणे प्रवासी व विद्यार्थ्यांचे हाल, वेळ व खर्च दुप्पट

Roads Length Dispute: पुण्यात रस्त्यांची लांबीवर गोंधळ: पथ विभाग म्हणतो २३७१ किमी, घनकचरा विभागाचा दावा तब्बल ६८९२ किमी

POCSO Justice: पॉक्सो प्रकरणांतील चिमुकल्यांना जलद न्याय : सात वर्षांहून अधिक अनुभवी सरकारी वकिलांची विशेष नियुक्ती

SCROLL FOR NEXT