crime news esakal
नाशिक

Nashik Crime News: बाळाला बाहेर नेल्यासंदर्भात विचारणा केल्याने पतीने पत्नीला केले ठार

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News: नऊ महीन्याच्या दुधपित्या बाळाला सकाळपासुन कुठेतरी बाहेर घेउन गेलेल्या पतीला घरी आल्यावर पत्नीने जाब विचाराल्याचा राग आल्याने धारदार शस्राने ठार केल्याची घटना शहरातील गंगादरवाजा भागात घडली आहे. (Husband killed his wife Nashik Crime News)

या घटनेबाबत मयत महिलेचे वडील केदारनाथ खैरनार यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. आरोपी बाळू जाधव हा मूळचा पाथर्डी येथील असून पाथर्डी येथे घर नसल्याने सुमारे पाच महिन्यांपूर्वी महिलेच्या वडिलांनी पती-पत्नीला गंगादरवाजा येथील लक्ष्मीमाता मंदिराजवळ कोपीचे घर राहण्यासाठी करून दिले होते.आरोपी बाळू आपल्या ९ महिन्याच्या लहान मुलगा छावडया याला सकाळपासुन कोठे तरी घेउन गेला होता.

तो दारू पिउन लहान मुलाला घरी परत घेउन आला असता त्याची पत्नी अर्चना हिने तुम्ही दुध पित्या लहान बाळाला सकाळ पासून कोठे घेऊन गेला होता असे विचारले.

मात्र याचा राग आल्याने बाळूने शिवीगाळ करून तिला मारहाण करण्यास सुरवात केली. त्याने स्वयंपाकाच्या खोलीतील पडलेला चाकु हातात घेउन अर्चनाच्या गळ्यावर,दंडावर चाकुचे वार करून तिस गंभीर दुखापत केली.

स्थानिक नागरिकांनी जखमी अर्चना यांना येवला ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाल्याने जखमी अर्चनाला नाशिक येथे हलवण्यात आले होते. मात्र तेथे तीस मयत घोषित करण्यात आले.

याबाबत संशयित आरोपी बाळू शंकर जाधव याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून शहर पोलिस ठाण्यात खुनाचा दाखल झाला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक सुरज मेढे करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: सुखावणारी बातमी! मुंबई, पुण्यासह मराठवाड्यात पावसाचं पुनरागमन; हवामान विभागाची महत्त्वाची अपडेट

उद्या मी मातृत्व स्वीकारलं तर... आई होण्याबद्दल पहिल्यादांच बोलली सई ताम्हणकर; म्हणते- आमच्या क्षेत्रात...

Pune University Result Delay: पुणे विद्यापीठाच्या भाषा भवनातील निकाल १०० दिवसांनंतरही प्रलंबित; ३०० हून अधिक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

शनीचे महासंक्रमण! 'या' ५ राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ; नोकरी आणि व्यवसायात प्रचंड यशाचा योग

Katraj Accident : कात्रज-कोंढवा रस्त्यावर भीषण अपघात; विद्यार्थिनीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT