An accident involving a pick-up vehicle carrying cattle.
An accident involving a pick-up vehicle carrying cattle. esakal
नाशिक

Nashik Crime News : जनावरांची अवैधरीत्या वाहतूक; 8 लाखाचा मुद्देमाल जप्त

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : कत्तलीसाठी गायींची अवैधरीत्या वाहतूक होत असल्याचा प्रकार मनमाड - चांदवड मार्गावर वाहनाच्या अपघातामुळे उघड झाला आहे.

यावेळी पोलिसांनी ५ गायी, ६ गोरे आणि पिकअप गाडी असा आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करत गाडीचा चालक शेख अजीज शेख बशीर (वय २१) यास ताब्यात घेतले. (Illegal transportation of animals 8 lakh worth of goods seized Nashik Crime News)

कत्तलीच्या उद्देशाने गोवंश जनावरांचे वाहन मालेगावात येणार असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना समजताच त्यांनी चांदवडच्या सोग्रस फाटा येथून एका पिकप गाडीचा पाठलाग केला.

मात्र सदर गाडी चालकाने मालेगावकडे न नेता ती मनमाडकडे वळविली. मनमाड शहरात प्रवेश करताच मनमाड चांदवड मार्गावर रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात गाडी आदळल्याने वाहनास अपघात झाला.

सकाळी आठला ही घटना घडल्याने एका व्यक्तीने पोलिसांना अपघात संदर्भात माहिती देत वाहनातून गायींची कत्तलीसाठी वाहतूक केली जात असल्याचे सांगितले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

त्यांनी पिकअप (एमएच ०५ आर ७२४८) ही गाडी खड्ड्यातून बाहेर काढत गाडीतील ५ गायी ६ गोरे असे ११ गोवंश यांची सुटका केली. होते.

यावेळी पिकअप चालक शेख अजीज शेख बशिर (वय २१ वर्षे रा. कुसूंबा रोड मालेगाव) यास याबाबत विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. याप्रकरणी मनमाड पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कोल्हापुरात; म्हणाले, खोके सरकारने एकही नवा उद्योग आणला नाही

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT