Independence Day 2023 Competition to make patriotic reels by Shiv Sena nashik news 
नाशिक

Independence Day 2023 : शिवसेनेतर्फे देशभक्तिपर ‘रिल्स’ बनवा स्पर्धा; 'हे' बक्षिसे जिंकण्याची संधी

सकाळ वृत्तसेवा

Independence Day 2023 : स्वातंत्र दिनानिमित्त शिवसेना शिंदे गटातर्फे देशभक्ती वाढण्याच्या अनुषंगाने ‘रिल्स’ बनविण्याची स्पर्धा आयोजित केल्याची माहिती जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी दिली. (Independence Day 2023 Competition to make patriotic reels by Shiv Sena nashik news)

हम हिंदुस्थानी (देशभक्तिपर), जय जय महाराष्ट्र माझा (मराठी अस्मिता, मराठी परंपरा, मराठमोळी वेशभूषा, मराठी खाद्य संस्कृती दाखवणारे), कलर्स ऑफ नाशिक (नाशिक पर्यटन, सौंदर्य, धार्मिक स्थळे, संस्कृती वैभव, स्वच्छ नाशिक संकल्पनेवर आधारित), आई पण भारी देवा (मुलांनी आईसोबत किंवा आईने मुलांसोबत तसेच परिवारासोबत बनवलेले रिल्स), असा मी - आसामी (सोलो डान्स, सिंगिंग, वकृत्व इतर कलाविष्कार.) हे रिल्सचे विषय आहेत.

एक किंवा एकापेक्षा अधिक विषयांवर प्रत्येकी एकच व्हिडिओ पाठवावा, व्हिडिओ हा कमीत- कमी ३० सेकंद व जास्तीत- जास्त ९० सेकंदाचा असावा. कॉपीराइट नियमांचे उल्लंघन नको. भावना दुखावणाऱ्या नको या अटी व नियम आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

प्रथम विजेत्याला दोन सॅमसंग मोबाईल, द्वितीय चार नॉईज कान्सालिंग इअरबड्स, तृतीय सहा स्मार्टवॉच बक्षिस दिले जाणार आहे. १२ ऑगस्टपर्यंत सायंकाळी पाचपर्यंत रिल्स स्वीकारले जाणार आहे. १५ ऑगस्टला पालकमंत्री दादा भुसे व उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्यांना बक्षीसे दिले जातील.

"आधुनिक युगातील रिल्सचा वापर करून प्रभावी जनजागृती झाल्यास त्याचा सकारात्मक परिणाम दृष्य स्वरूपात दिसू शकेल, या भावनेने स्वातंत्र्य दिनानिमित्त उपक्रम राबविला जात आहे. नाशिकचे ज्ञात, अज्ञात पैलू लोकांसमोर यावेत, कौटुंबिक जिव्हाळा वृद्धींगत व्हावा, हादेखील उद्देश आहे." - अजय बोरस्ते, जिल्हाप्रमुख, शिवसेना.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

Gram Panchayat Delimitation: प्रभागरचनेचे काम, तलाठ्यांना घाम ; ग्रामपंचायतीकडेच सोपवा; संघटनेची महसूल विभागाकडे मागणी

Laxman Hake: ओबीसी आरक्षणासाठी मोठा एल्गार! लक्ष्मण हाकेंची मोठी घोषणा; मुंबईकडे कूच करण्याचा निर्धार

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

15000 Teacher Recruitment : TET ची अट रद्द! राज्यात 15 हजार शिक्षकांची मेगा भरती; 600 क्रीडा शिक्षकांसाठी स्वतंत्र पात्रता निकष जाहीर, ऑनलाईन मागविले अर्ज

SCROLL FOR NEXT