
'Instagram reels' बनवून तुम्हीही होऊ शकता मालामाल; कसे ते जाणून घ्या एका क्लिकवर
Instagram reels : हल्ली तरुण पिढी असो किंवा वयोवृद्ध सोशल मीडियाकडे सगळ्यांचाच कल दिसून येतो. रील बनवण्यास शौकीन असलेल्या लोकांसाठी इंस्टाग्रामने एक मोठी भेट दिली आहे. आता इंस्टाग्रामवरून पैसे कमवण्याचा पर्यायही समोर आला आहे, ज्याची रील लोकांना आवडेल, तो तेवढे पैसे कमवू शकतो. इंस्टाग्राम बोनस देण्याबरोबरच आता नवीन गोष्टीही देणार आहे.
यासाठी इंस्टाग्रामवर खाते असणे सर्वात महत्त्वाचे आहे. तुम्हालाही रील्स बनवण्याचा शौक असेल आणि इन्स्टाग्रामवरून पैसे कमवायचे असतील तर इन्स्टाग्राम डाउनलोड करा. मग त्यावर रील बनवून अपलोड करा. इंस्टाग्राम रील्स बनवणाऱ्या लोकांना पैसे देईल.
सध्या सोशल मीडियावर रील बनवण्याचा ट्रेंड जोरात सुरू आहे. प्रत्येकजण स्वत:ला प्रसिद्ध करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे रील बनवत आहे आणि सोशल मीडियावर व्हायरल करत आहे. असे काही व्हिडिओ आहेत ज्यांना हजारो लाईक्स येतात, त्यामुळे अशा लोकांसाठी इंस्टाग्राम सर्वोत्तम असेल.
तुमच्या अकाउंटला बिजनेस किंवा क्रिएटर अकाउंटमधे बदला
आम्ही तुम्हाला सांगतो की हे फीचर अनेक महिन्यांपासून लाइव्ह चालू आहे. मात्र हे केवळ काही क्रिएटर्सलाच मिळाले आहे. मात्र आता मार्चअखेरीस ते सर्वांसाठी आणले जाईल. जर तुमचे खाते आधीच Insta वर तयार केले असेल, तर त्यासाठी तुम्हाला तुमचे खाते बिजनेस किंवा क्रिएटर खात्यात बदलावे करावे लागेल. यानंतर तुम्हाला नियमित रील अपलोड करावी लागतील. तुम्ही Insta वर जाऊन क्रिएटरमध्ये तुमचं स्टेटस तपासू शकता. यानंतर, तुम्हाला बोनसचा पर्याय मिळेल. (Earning) जर तुम्हाला ते मिळत नसेल, तर तुम्ही तुमची विनंती InstaHelp वर करू शकता.
प्रत्येक रिल्सवर मिळेल 550 रुपयांचं गिफ्ट
जर तुम्ही यासाठी पात्र असाल तर रीलमध्ये तुमच्या नावाच्या वर सेंड गिफ्टचा पर्याय दिसेल. तुमचे फॉलोवर्स तुम्हाला गिफ्टच्या स्वरुपात स्टार म्हणून देतील. ४५ स्टार मिळवण्यासाठी ९५ रुपये आणि ३०० मिळवण्यासाठी ५५० रुपये दिले जातील. लाइक्स जसजसे वाढतील तसतसे तुमचे उत्पन्नही वाढेल. लवकरच याचा लाभ सर्वांना मिळणार आहे. तेव्हा तुम्हीही इन्स्टा रिल्सच्या माध्यमातून मालामाल होऊ शकता. (Instagram)