Indian Oil Project Owner Driver Carriers protest Against arbitrary action by security officials nashik news 
नाशिक

Nashik Protest News : सुरक्षा अधिकाऱ्याकडून वाहकाला अरेरावी; इंडियन ऑईल प्रकल्प मालक-चालक-वाहकांचा बंद

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : इंडियन ऑईल इंधन प्रकल्पातील सुरक्षा अधिकाऱ्याच्या मनमानी कारभाराविरुद्ध इंधन वाहतूकदार मालक-चालक-वाहकांनी आंदोलन करून संप पुकारला आहे. संबंधित अधिकाऱ्याची येथून बदली करण्याची मागणी वाहतूकदारांनी मंगळवारी (ता. ३१) केली. (Indian Oil Project Owner Driver Carriers protest Against arbitrary action by security officials nashik news)

इंडियन ऑइल प्रकल्पातील सुरक्षा अधिकारी कुलारी यांनी टँकरवर असलेल्या वाहकाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून कामावरून काढून टाकले. सदर कर्मचारी हा गरीब व होतकरू असून, त्याने रीतसर गेटवरून कायदेशीर पूर्तता करून टँकर भरण्यासाठी आत प्रवेश केला होता.

मात्र, संबंधित सुरक्षा अधिकाऱ्याने कुठलीही विचारपूस न करता त्यास अरेरावी करीत त्याचा गेटपास जमा करून घेतला.

‘यापुढे कंपनीत येऊ नको आणि तुझ्याबरोबर असेल त्यांनाही एकेकाला बाहेर काढून टाकेन’ अशी धमकी दिली.

त्यामुळे संतापलेल्या टँकर मालक-चालक-वाहकांनी या अधिकाऱ्याच्या विरोधात बंद पुकारून टँकर न भरण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्यातील विविध ठिकाणी केला जाणारा इंधनपुरवठा ठप्प झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Soldier Martyred: मुलाच्या पहिल्या वाढदिवसाचे स्वप्न अपुरेच! १५ दिवसांवर असताना उरीत जवान अर्जुन जाधव हुतात्मा, बाबा येणार होते घरी...

जगबुडी नदीत बुडून तीन भावांचा अंत, मुंबईतील कुटुंबावर काळाचा घाला; काठावर दोन भाऊ हताश

Amethi Samosa : ट्रेन थांबताच प्रवाशांची तुटून पडणारी गर्दी! फक्त समोशांवर GST भरणाऱ्या त्रिवेदी परिवाराने ४४ वर्षांपासून कशी जपली 'शटल एक्सप्रेस'ची चव?

Maharashtra Farmer Loan Waiver : कर्जमाफीसाठी तूर्तास १५ हजार कोटीच, नियमित कर्जफेड करणाऱ्यांना धक्का, प्रोत्साहनपर अनुदानाचा निधी लांबणीवर?

Ahmedabad plane crash: ‘बाबा, मी विमानात बसलो आहे...’; शेवटचा मेसेज ठरला अखेरचा, वर्षानंतरही अहमदाबाद दुर्घटनेच्या जखमा ताज्याच..

SCROLL FOR NEXT