Officials participating in the meeting regarding Simhastha Kumbh Mela  esakal
नाशिक

Simhastha Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्याचा आराखडा तयार करण्याच्या सूचना

सकाळ वृत्तसेवा

Simhastha Kumbh Mela : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून राज्य शासनाला अहवाल सादर केला जाणार आहे.

त्यापूर्वी महापालिकेच्या एकूण ४३ विभागांकडून पंधरा दिवसांत सिंहस्थाचा विभागनिहाय आराखडा तयार करण्याच्या सूचना महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी शुक्रवारी (ता. ४) दिल्या.

२०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत असून, त्यासाठी पायाभूत सेवा-सुविधा पुरविणे गरजेचे आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. (Instructions for planning Simhastha Kumbh Mela nashik news)

पालकमंत्री दादा भुसे यांनी महापालिकेला आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यात बाह्य रिंगरोडची संकल्पना मांडण्यात आली. रस्ते विकास महामंडळाकडून सदर बाह्य रिंगरोड तयार केला जाणार आहे.

त्या व्यतिरिक्त महापालिकेला शहरी भागात पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी, आराखडा तयार करण्यासाठी महापालिका मुख्यालयात बैठक झाली. सिंहस्थ आराखडा तयार करण्यासाठी समन्वय समिती गठित केली आहे. बैठकीमध्ये सिंहस्थ योजनांसंदर्भात चर्चा करण्यात आली.

यात सिंहस्थ कामांचा सविस्तर आराखडा तयार करणे, सल्लागार संस्थेची नियुक्ती, महापालिका स्तरावर स्वतंत्रपणे विकास आराखडा तयार करणे, मोठ्या कामांचे आराखडे तयार करणे या प्रकारच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सिंहस्थाचा सर्वाधिक संबंध पाणीपुरवठा, बांधकाम विभाग, घनकचरा व्यवस्थापन, अग्निशमन विभाग, तसेच नगररचना विभागाशी अधिक येतो. त्यामुळे या विभागांनी पंधरा दिवसांत प्राथमिक स्वरूपात सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

महापालिकेची समिती

समन्वय अधिकारी शहर अभियंता, अतिरिक्त आयुक्त उपाध्यक्ष, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, मुख्य लेखापरीक्षक, उपायुक्त (प्रशासन), उपायुक्त (अतिक्रमण), उपसंचालक, नगरनियोजन, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी, अधीक्षक अभियंता, यांत्रिकी व विद्युत वैद्यकीय (आरोग्य) अधिकारी, घनकचरा व्यवस्थापन संचालक, मिळकत व्यवस्थापक, मुख्य अग्निशमन अधिकारी, स्मार्टसिटी मुख्य कार्यकारी अधिकारी सदस्य, तर पदसिद्ध सचिव म्हणून शहर अभियंता यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand Pub Fire : पबमध्ये मध्यरात्री भीषण अग्नितांडव, २७ जणांचा होरपळून मृत्यू, ६३ गंभीर जखमी; दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर

Constitutional Amendment India: मंत्रिपदावरून हटविण्याऐवजी निलंबन;प्रस्तावित १३०व्या घटनादुरुस्ती विधेयकाबाबत संसदीय समितीची शिफारस

शेतकऱ्यांना ३१ जुलैपूर्वी कर्जमाफी! ३ टप्प्यात कर्जमाफी, १५ लाख शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होणार; पहिल्यांदा कर्जमाफी कोणाला? निकष काय बदलले, वाचा सविस्तर...

अर्थवेध : भारतीय गुंतवणूकदारांचा विजय; ‘एफआयआय’ युगाचा अस्त?

ढिंग टांग : वैशाखनंदन संवाद..!

SCROLL FOR NEXT