Nashik ZP Recruitment 2023 : जिल्हा परिषदेत 1 हजार 38 जागांसाठी मेगा भरती; या संकेतस्थळावर करा अर्ज

Recruitment
Recruitmentesakal

Nashik ZP Recruitment 2023 : जिल्हा परिषदेतील भरतीला अखेर मुहूर्त लागला आहे. या भरतीच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेतील रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्यास प्रारंभ झाला आहे.

२० संवर्गातील तब्बल एक हजार ३८ पदांची भरती प्रक्रिया पार पडणार असून, यासंदर्भात नाशिक जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली.

जिल्हा परिषदेतील रिक्त जागांची संख्या पाहता भरती करण्याची मागणी अनेकदा झाली. गेल्या वर्षी रिक्त जागांचा आढावा घेत राज्य शासनाने जिल्हा परिषदेत मेगा भरतीची घोषणा केली होती. (Nashik ZP Mega recruitment for 1 thousand 38 seats news)

त्यानंतर, राजकीय घडामोडी पार पडल्या. यात भरती विषय बाजूला गेला होता. मार्चमध्ये पुन्हा भरती प्रक्रियेला वेग येऊन, भरतीसाठी एजन्सी निश्चित करण्यात आली होती.

त्यानंतर पुन्हा हालचाली थंडावल्या. त्यामुळे भरती होणार की नाही, याबाबत शंका उपस्थित केल्या जात होत्या. याच दरम्यान, भरती प्रक्रिया राबविण्यासाठी असलेल्या समितीच्या बैठका झाल्या. भरतीसाठी असणारी प्रक्रिया निश्चित करण्यात आली. अखेर या भरतीला पुन्हा मुहूर्त लागला आहे.

सरळसेवेने भरावयाच्या पदाकरिता https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ या संकेतस्थळावर अधिकृत अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी https://zpnashik.maharashtra.gov.in या नाशिक जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध सविस्तर जाहिरात वाचून त्याप्रमाणे विहित मुदतीत अर्ज सादर करावेत. ऑनलाइन भरलेल्या अर्जाव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारे भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Recruitment
Nashik Teacher Recruitment : जिल्ह्यात शिक्षकांच्या 1100 जागा रिक्त; बिगरआदिवासी तालुक्यांना मिळणार दिलासा

सरळसेवा भरती प्रक्रिया संदर्भातील सविस्तर जाहिरात https://zpnashik.maharashtra.gov.in या नाशिक जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून, उमेदवारांनी जाहिरातीत नमूद संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून ऑनलाइन पद्धतीनेच https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ या संकेतस्थळावर आपले अर्ज सादर करावेत.

सदर संकेतस्थळाला भरतीप्रक्रियेदरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरतीप्रक्रियासंबंधित आवश्यक अद्ययावत माहिती प्राप्त करून घेण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील, अशी माहिती जिल्हा परिषदेतर्फे देण्यात आली आहे.

ही पदे भरली जाणार

(कंत्राटी) ग्रामसेवक (५०), आरोग्य पर्यवेक्षक (३), आरोग्य परिचारिका, आरोग्यसेवक (महिला) (५९७), आरोग्यसेवक (पुरुष) ४० टक्के (८५), आरोग्यसेवक (पुरुष) ५० टक्के (१२६), औषधनिर्माण अधिकारी (२०), प्रयोगशाळा तंत्रज्ञ (१४), विस्तार अधिकारी (सांख्यिकी) ( २), विस्तार अधिकारी(शिक्षण) (वर्ग तीन श्रेणी दोन) (७), वरिष्ठ सहाय्यक (३), पशुधन पर्यवेक्षक (२८), कनिष्ठ आरेखक (२), कनिष्ठ लेखा अधिकारी (१), कनिष्ठ सहाय्यक (लेखा) (५), कनिष्ठ सहाय्यक (लिपिक) (२२), मुख्य सेविका/ पर्यवेक्षिका (४), कनिष्ठ यांत्रिकी (१), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/ ग्रा.पा पु.) (३४), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (स्थापत्य) इवद (३३), लघुलेखक (उच्च श्रेणी) (१)... एकूण = १०३८

Recruitment
Nashik NCP Job Fair : राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्ह्यातील बेरोजगारांसाठी सोमवारी नोकरी महोत्सव; येथे करा नावनोंदणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com