Zarif Chisti Baba esakal
नाशिक

जरीफबाबा खून प्रकरण : वाहनचालकासह तिघांना मुंबईतून अटक

संशयितांना पकडण्यासाठी नाशिक ग्रामीणचे पोलिस मागावर होते.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : निर्वासित अफगाणी सुफी धर्मगुरू जरीफबाबा यांच्या खून प्रकरणातील मुख्य संशयित व त्यांच्या जुन्या वाहनचालकासह तिघांना मुंबईतील बदलापूरमधून नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. ही माहिती पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली. रवींद्र तोरे (रा. कोळपेवाडी, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर) असे या वाहनचालकाचे नाव आहे. (Latest Marathi News)

ख्वाजा सय्यद जरीफ अहमद चिश्ती उर्फ जरीफबाबा (वय २८) असे या निर्वासित अफगाण धर्मगुरूंचे नाव आहे. जरीफबाबा हे पत्नी तरिनासह वावी परिसरात राहात होते. येवला शहर पोलिस ठाण्यात जरीफबाबा यांचा वाहनचालक अफजल अहमद कुर्बान खान (वय ३४, रा. मिरगाव, सिन्नर) याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार मंगळवारी (ता. ५) जरीफबाबासह ते चारचाकी वाहनाने (एमएच ४३, बीयू ७८८६) वावीहून येवला येथे धार्मिक विधीसाठी गेले होते. सायंकाळी त्यांचा जुना वाहनचालक रवींद्र तोरे याने चिचोंडी औद्योगिक वसाहत परिसरात जमिनीची पूजा करण्यासाठी बोलावले होते. पूजाविधी आटोपल्यानंतर संशयितांनी त्यांच्यावर गोळी झाडून खून केला. तेव्हापासून संशयित पसार होता.

संशयितांना पकडण्यासाठी नाशिक ग्रामीणचे पोलिस त्यांच्या मागावर होते. संशयित मुंबई परिसरात असल्याची माहिती मिळाली असता, पोलिसांनी बदलापूर परिसरातून मुख्य संशयित रवींद्र तोरे याच्यासह तिघांना अटक केली. मुख्य संशयिताला अटक झाल्याने या खुनाचा उलगडा पोलिस चौकशीतून होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT