Latest Marathi News | नाशिक जिल्ह्याला पुढचे 4 दिवस रेड अलर्ट

ग्रामीण भागात पुर परिस्थिती निर्माण झाली आहे.
 Nashik district rain updates
Nashik district rain updatesesakal

नाशिक : नाशिक जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात धुव्वाधार पाऊस सुरू आहे. गंगापुर, दारणा, वालदेवी, पालखेड, पुनद, मुकने, कादवा, धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने नद्याही दुथडी भरुन वाहू लागल्या आहेत. अनेक ठिकाणी पुर परिस्थिती निर्माण झाली असून नदी- नाल्यांवरील पुल पाण्याखाली गेले आहेत. अशातच मुसळाधार पावसाची शक्यता वर्तवली जात असताना हवामान खात्याने पुढच चार दिवस नाशिक जिल्ह्याला रेड अलर्ट घोषित केला आहे.

 Nashik district rain updates
नाशिक जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले; अनेक गावांमध्ये पुर परिस्थिती

नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यातील ४ महत्वाच्या धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जात असल्याने मुख्य नद्यांसह उप नद्यांना पुर आले आहेत. मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागात अनेक ठिकाणी नद्यांवरील पुल पाण्याखाली गेले आहेत. ग्रामीण भागात पुर परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत दक्षता म्हणून हवामान खात्याने 11 ते 14 जुलै दरम्यान नाशिक जिल्ह्यात रेड अलर्ट घोषित केला आहे. रस्ते- पुल पाण्याखाली गेल्याने नागरिकांपुढे मोठ्या समस्या उभ्या ठाकल्या आहेत.

हवामान खात्याने घोषित केलेल्या रेड अलर्ट प्रमाणे नाशिक जिल्ह्यातील पुढील चार दिवसांची स्थिती.
हवामान खात्याने घोषित केलेल्या रेड अलर्ट प्रमाणे नाशिक जिल्ह्यातील पुढील चार दिवसांची स्थिती.esakal
 Nashik district rain updates
Aditya Thackeray यांनी बांधलेला पुल गेला पुराच्या पाण्यात; पाहा Video

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com