bibtya in pinjra.jpg
bibtya in pinjra.jpg 
नाशिक

VIDEO : बार्डे,गोसराणेकरांनी सोडला सुटकेचा निश्वास! मध्यरात्री पिंजऱ्यात अडकला बिबट्या; सीसीटिव्हीतील थरार

किरण सुर्यवंशी

नाशिक / अभोणा : बार्डे, गोसराणे (ता.कळवण) परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याच्या मुक्तसंचारामुळे येथील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण तयार झाले होते. सोमवार(ता.7 )रोजी पंडित वाघ यांच्या घराजवळ लावलेल्या पिंजऱ्यात पहाटे दोन वाजेच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याचे दृष्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

धुमाकूळ घालून दहशत घालणारा बिबट्या जेरबंद

बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याने बार्डे,गोसराणे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. या परिसरात बिबट्याने धुमाकूळ घालून दहशत निर्माण केली होती. रात्रीच्या वेळी कुणीही घराबाहेर पडत नसे.सातच्या आत घरात अशी स्थिती निर्माण झाली होती.परिसरातील बऱ्याच पाळीव प्राण्यांवर हल्ले करून,या बिबट्याने जनावरे फस्त केली होती. जेरबंद झालेल्या बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना सूचना देऊन बिबट्या त्यांच्या ताब्यात देण्यात आला.

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमारकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

PM Modi's Advice To Muslims: जगभरातला मुसलमान बदलतोय पण... मुस्लिम धर्मियांना पहिल्यांदाच PM मोदींनी का दिला सल्ला?

Shekhar Suman : शेखर यांच्या मुलाला होता 'हा' गंभीर आजार; लेकाच्या निधनानंतर उचललं गंभीर पाऊल

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी एक वाजेपर्यंत देशात 39.92 टक्के मतदान; महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद

बापरे! बॉल समजून पकडला बॉम्ब ... 13 वर्षीय मुलाचा स्फोटात मृत्यू , नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT