esakal | गोणीतून चिमुरड्याचा आवाज येताच ते थबकले...अमानवीय घटनेने नागरिकांत संताप
sakal

बोलून बातमी शोधा

goni.jpg

लहान मुलांना निदर्यीपणे मारहाण केल्याच्या अनेक धक्कादायक घटना तुम्ही पाहिल्या किंवा ऐकल्या असतील. पण ही घटना धक्कादायक आणि अविश्वसनीय आहे. अवघ्या पाच वर्षांच्या मुलासोबत अमानुष प्रकार घडला. त्या चिमुकल्याशी कोणाचे काय वैर असावे असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो.

गोणीतून चिमुरड्याचा आवाज येताच ते थबकले...अमानवीय घटनेने नागरिकांत संताप

sakal_logo
By
हर्षवर्धन बोऱ्हाडे

नाशिक : लहान मुलांना निदर्यीपणे मारहाण केल्याच्या अनेक धक्कादायक घटना तुम्ही पाहिल्या किंवा ऐकल्या असतील. पण ही घटना धक्कादायक आणि अविश्वसनीय आहे. अवघ्या पाच वर्षांच्या मुलासोबत अमानुष प्रकार घडला. त्या चिमुकल्याशी कोणाचे काय वैर असावे असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. 

असा घडला प्रकार

देवळालीगाव, रोकडोबावाडी येथील बाली आत्माराम पवार यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचा पाच वर्षांचा मुलगा राघव दुकानात साखर आणण्यासाठी गेला होता. खूप वेळ होऊनही तो घरी न आल्याने कृष्णा दोंदे त्याला शोधण्यासाठी बाहेर गेले. प्रतीक इंगळे व पंकज इंगळे यांनी राघवला गोणीत घातलेले आढळले. राघव रडत असल्याने कृष्णा दोंदे यांनी प्रतीक व पंकजच्या पाया पडून त्याला सोडण्याची विनंती केली. त्यानंतर त्याला सोडण्यात आले. दोघांनी त्याला शिवीगाळ करून मारहाण केली असल्याचा धक्कादायक खुलासा झाला. 

हेही वाचा >VIDEO : विचित्रच! मुंडकं नसलेला व्यक्ती दिसताच नाशिककरांची भंबेरी उडते तेव्हा;नेमका प्रकार काय?​

पोलिसांत गुन्हा दाखल

साखर आणण्यासाठी दुकानात गेलेल्या पाच वर्षांच्या बालकाला दोन जणांनी गोणीत डांबून ठेवले. देवळालीगावाजवळील रोकडोबावाडी येथे हा प्रकार घडला. उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

हेही वाचा > समाजमन सुन्न! निष्पाप चिमुकल्यांशी असे कोणते वैर; आत्महत्या की घातपात?

go to top