esakal | Marathi News Latest & Breaking | Live Marathi News Maharashtra, Mumbai & Pune | Marathi Newspaper | ताज्या मराठी बातम्या | eSakal.com
sakal

बोलून बातमी शोधा

delivery woman video.png

गरोदर महिला महापालिकेच्या मोरवाडी रुग्णालयात तपासणीसाठी गेली होती. प्रसूती कळा सुरू असतानाही तिला संबंधित डॉक्टरांनी दाखल करून घेतले नाही. त्यामुळे ती घराकडे परत येत असताना रस्त्यातच तिची प्रसूती झाली. याच प्रकरणासंदर्भातील "महिला रुग्ण व महिला डॉक्टर" यांच्यातील वादग्रस्त व्हिडिओ बाहेर आल्याने पुन्हा एकदा नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता या निमित्ताने वर्तविली जात आहे.

ब्रेकिंग : रस्त्यावर प्रसुती झालेल्या बाळंतीण महिलेवर डॉक्टरचा दबाव; "महिला रुग्ण व डॉक्टर" मधील वादग्रस्त संभाषणाचा VIDEO व्हायरल

sakal_logo
By
प्रमोद दंडगव्हाळ

नाशिक / सिडको : शिवशक्ती चौकातील महिला महापालिकेच्या मोरवाडी येथील रुग्णालयात तपासणीसाठी गेली होती. प्रसूती कळा सुरू असतानाही तिला संबंधित डॉक्टरांनी दाखल करून घेतले नाही. त्यामुळे ती घराकडे परत येत असताना रस्त्यातच तिची प्रसूती झाली. याच प्रकरणासंदर्भातील "महिला रुग्ण व महिला डॉक्टर" यांच्यातील वादग्रस्त व्हिडिओ बाहेर आल्याने पुन्हा एकदा नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता या निमित्ताने वर्तविली जात आहे.

डॉक्टर महिलेचा तो अट्टाहास...

मागील दोन दिवसापासून सिडको मनपा रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आल्यानंतर आता पुन्हा एकदा याच प्रकरणासंदर्भातील "महिला रुग्ण व महिला डॉक्टर" यांच्यातील वादग्रस्त व्हिडिओ बाहेर आल्याने पुन्हा एकदा नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता या निमित्ताने वर्तविली जात आहे. हा वादग्रस्त व्हिडिओमध्ये सिडकोतील मोरवाडी येथील श्री स्वामी समर्थ या मनपाच्या रुग्णालयात एक महिला डॉक्टर रस्त्यात प्रसुती झालेल्या महिला कशी चुकीची वागली.. ही चूक कबूल करण्यासाठी कशा प्रकारे तिच्यावर दबाव आणत आहे हे बघायला मिळत आहे. तसेच त्या रुग्णावर रागवणे, दरडविणे व दबाव टाकून तिच्याकडून कसं कबूल करून घेता येईल याकरिता डॉक्टर महिलेचा तो अट्टाहास बघून हसावं की रडावं असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

"हे बघ तू खोटं बोलते"  बाळंतीण महिलेवर डॉक्टरचा प्रश्नांचा भडीमार

या व्हिडिओमध्ये त्या डॉक्टर महिलेने एका बाळंतीण झालेल्या महिलेला वापरलेले शब्द ऐकून तुमचा संताप झाल्याशिवाय राहणार नाही. "तुझी चूक तर तू मान्य कर", "तू काय बहिरी होते का ? "हे बघ खोटारडेपणा करायचा नाही", " हे बघ तू खोटं बोलते", "तुझा नवरा कोठे आहे? तुम्हाला काही वाटायला पाहिजे ? "तुला इंग्लिश वाचायला लावलं का  ? तू खोटं बोलते ? तू आगाऊपणा केला ? तुम्हाला मनाची लाज वाटली पाहिजे ? पेशंट लोक बावळट आहे का ? या सर्व प्रश्नांचा भडीमार डॉक्टर महिला त्या अबला महिला रुग्णावर करताना दिसून येत आहे. त्यामुळे आपण किती बरोबर आहोत आणि सदर बाळंतीण झालेली महिला कशी चुकीची आहे. हे दाखवण्याचा अट्टाहास व दबाव आणणार हा व्हिडिओ बघितल्यानंतर या डॉक्टर महिले बद्दल काय बोलावे ? असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होत आहे.

हेही वाचा >VIDEO : विचित्रच! मुंडकं नसलेला व्यक्ती दिसताच नाशिककरांची भंबेरी उडते तेव्हा;नेमका प्रकार काय?​

वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करा

परिसरातील महिलांनी मदत केल्याने तिची प्रसूती सुखरूप झाली. दरम्यान महिलेकडे कानाडोळा करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेविका भाग्यश्री ढोमसे यांनी महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली.

हेही वाचा > समाजमन सुन्न! निष्पाप चिमुकल्यांशी असे कोणते वैर; आत्महत्या की घातपात?

संपादन - ज्योती देवरे

go to top