Madhukar Kad while accepting the post of Senior Police Inspector of Panchvati Police Station from Sohan Machare. esakal
नाशिक

Nashik Police Transfer : पंचवटी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी मधुकर कड; सोहन माछरे यांची बदली

पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्याने ठाणे शहरातील वागळे इस्टेट पोलिस ठाण्यातून निरीक्षक मधुकर कड यांची नाशिक शहर आयुक्तालयात नियुक्ती झाली होते.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस महासंचालक कार्यालयामार्फत राज्यातील १३० पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्याने ठाणे शहरातील वागळे इस्टेट पोलिस ठाण्यातून निरीक्षक मधुकर कड यांची नाशिक शहर आयुक्तालयात नियुक्ती झाली होते.

नाशिकमध्ये पुन्हा 'कमबॅक' करत शुक्रवार (दि ०२) रोजी सायंकाळी पंचवटी पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारला. (Madhukar Kad as Senior Police Inspector of Panchavati Police Station nashik police transfer news)

शहर, ग्रामीण व परिक्षेत्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या बदल्यानंतर आता महासंचालक कार्यालयातर्फे निःशस्त्र पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित होते. दोन वेळा राष्ट्रपती पोलिस पदक विजेते मधुकर कड यांची नाशिक शहरात नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, ठाणे शहरात बदली होण्यापूर्वी वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड हे नाशिक शहर पोलिस दलात कार्यरत होते.

यापूर्वी नाशिक दहशतवादी विरोधी पथक (एटीएस), भद्रकाली, अंबड व पंचवटी पोलिस ठाण्यात त्यांनी दमदार कामगिरी केली होती. अनेक सराईत गुन्हेगारांवर त्यांनी कठोर कारवाई केली होती, त्यांच्या कामाचा आलेख बघता शुक्रवार (दि ०२ ) रोजी वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनी सायंकाळी पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदाचा पदभार स्वीकारला.

गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यात हातखंडा

काही वर्षांपूर्वी कड पोलिस निरीक्षक म्हणून काम केले असून काही दिवसांपूर्वी त्यांची मुंबई येथून नाशिक बदली झाली. कड यांची पंचवटी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी नेमणूक झाल्याने गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी मदत होईल असे खाकी वर्दीत बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaysingpur Heavy Rain : जयसिंगपुरात ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार; घरांमध्ये पाणी, कोल्हापूर-सांगली महामार्गावर फूटभर पाणी

Manchar News : वादळी वाऱ्यामुळे केळी, मका व आंबा पिकांचे मोठे नुकसान; प्रशासनाला पंचनामे करण्याच्या दिलीप वळसे पाटील यांच्या सूचना

MP Supriya Sule : ‘नरेटिव्ह’ पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई का नाही?

अमरावतीत ट्विस्ट! महायुतीत बंडखोरी करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला, आता रिंगणात चार उमेदवार, नेमकं काय घडतंय?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावाकडे शासनाचे दुर्लक्ष; स्मारकासाठी मंजूर केलेला दोन कोटींचा निधी गेला कुठं?

SCROLL FOR NEXT