Jai Jai Maharashtra Majha
Jai Jai Maharashtra Majha esakal
नाशिक

Maharashtra Rajyageet: पाठ्यपुस्तकांत यंदा राज्यगीताची छपाई; प्रत्येक इयत्तेच्या पुस्तकांची 4 भागात विभागणी

विजय पगारे

Maharashtra Rajyageet : यंदा पाठ्यपुस्तकात प्रत्येक धड्यापाठोपाठ वह्यांची पाने समाविष्ट केल्याने विद्यार्थ्यांना स्वतंत्र वही शाळेत आणण्याची गरज नसल्याने दप्तरांचे ओझे कमी होणार आहे. नव्या पुस्तकांमध्ये आता महाराष्ट्र राज्यगीताचीही छपाई करण्यात आली आहे.

शिवाय प्रत्येक पुस्तकाची चार भागात विभागणी करण्यात आल्याने विद्यार्थ्यांसाठी सुटसुटीत झाली आहेत. इगतपुरी तालुक्यात पहिल्याच दिवशी पुस्तकांच्या वाटपाचे नियोजन पूर्ण झाले आहे. (maharashtra Rajyageet printed in textbooks Division of books of each grade into 4 parts nashik news)

सारे शिकूया, पुढे जाऊया असे ब्रीद वाक्य म्हणत सुरू केलेल्या सर्व शिक्षा व समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या मुलांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यासाठी तयारी अंतिम टप्प्यात आहे.

इगतपुरी पंचायत समितीचा शिक्षण विभागाने तालुक्यात शाळेच्या पहिल्याच दिवशी पहिली ते आठवीच्या एकुण ३३ हजार ६४९ विद्यार्थ्यांच्या हाती एक लाख ३४ हजार ५९६ नव्या कोऱ्या पुस्तकांचे वाटप करण्याचे नियोजन केले आहे.

पुस्तके शिक्षण विभागाकडे प्राप्त झाली असून आजपासून केंद्रस्तरावर पुस्तकांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी नीलेश पाटील यांनी दिली.

येत्या १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. इगतपुरी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या २२३, माध्यमिकच्या ६७ व खासगी ४ अशा एकूण ३१३ शाळांत ही पुस्तके वितरित केली जाणार आहेत.

पहिली ते ५ वीचे एकूण २१ हजार २१३ तर ६ वी ते ८ वीचे १२ हजार ४३६ असे मिळून एकूण ३३ हजार ६४९ विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी नवी कोरी पुस्तके मिळणार आहेत.

तालुक्यातील एकूण १८ केंद्रातून शाळास्तरावर केंद्रप्रमुखांनी येत्या दोन दिवसांचे शाळेत पुस्तके वितरित करण्याचे नियोजन केले आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, गावातील सरपंच, उपसरपंच व पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य, शिक्षणप्रेमी नागरिक यांच्या हस्ते वितरण होणार आहे अशी माहिती पाठ्यपुस्तक वितरण विभागाचे प्रमुख मनोज झांजरे व बाळासाहेब मुर्तडक यांनी दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पुस्तकाची चार भागात विभागणी

या वर्षीची पाठयपुस्तके ही शासनाने जाहीर केल्याप्रमाणे प्रत्येक इयत्तेची चार विभागात सर्व विषय समाविष्ट केलेली आहेत. ‘एक सत्र एक पुस्तक’ या प्रमाणे प्रत्येक भाग हा तीन महिन्यासाठी असणार आहे.

चालू वर्षीची नवीन पुस्तके पाहून शिक्षकही सुखावले आहेत. या पुस्तकात यंदापासून प्रथमच प्रत्येक धड्याच्या शेवटी कोरी पाने वर्ग व गृहपाठासाठी दिली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्याला प्रत्येक विषयाची स्वतंत्र वही आणण्याची गरज नाही.

धडा संपताच त्यातील अवघड शब्द, कठीण प्रश्नांची उत्तरे तिथेच लिहिली जाणार असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास करणे सोपे जाणार आहे. स्वतंत्र वही सोबत न्यावी लागणार नसल्याने दप्तरांचे ओझे कमी होणार आहे.

यंदाच्या पाठ्यपुस्तकांत राज्यगीताची छपाई कऱण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच राज्यगीताबद्दल माहिती व्हावी, प्रेरणा मिळावी या उद्देशाने बालभारतीने पुस्तकांत ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताची छपाई केली आहे हे आणखी एक वैशिष्ट आहे.

आकडे बोलतात :

इयत्तानिहाय विद्यार्थी संख्या

इयत्ता १ ली : ४ हजार ४३२

इयत्ता २ री : ४ हजार ४३२

इयत्ता ३ री : ४ हजार ४३२

इयत्ता ४ थी : ३ हजार ९५४

इयत्ता ५ वी : ३ हजार ९६३

इयत्ता ६ वी : ४ हजार ०९५

इयत्ता ७ वी : ४ हजार ११०

इयत्ता ८ वी : ४ हजार २३१

....................

एकूण लाभार्थी : ३३ हजार ६४९

"उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर १५ जूनपासून तालुक्यातील सर्व शाळा सुरू होणार आहेत. पात्र विद्यार्थ्यांना तालुक्यातील लोकप्रतिनिधी, शाळा व्यवस्थापन समिती, स्थानिक नागरिक व पालकांच्या समक्ष ही पुस्तके शाळेच्या पहिल्याच दिवशी समारंभपूर्वक वाटप करण्याच्या सूचना सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत."

- नीलेश पाटील, गटशिक्षणाधिकारी, इगतपुरी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Result: लोकसभेचा आज महानिकाल! NDA हॅट्रिक साधणार की INDIA सत्तेत येणार याची उत्कंठा शिगेला

Manoj Jarange: उपोषणाला आता अंतरवलीच्या नागरिकांचाच विरोध! जरांगे म्हणतात, आता मन...

SL vs RSA T20 WC 2024 : आफ्रिकेला 77 धावा करताना फुटला घाम; श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलं टेन्शन

Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीचा निकाल कधी अन् कुठं पाहणार, जाणून घ्या एका क्लिकवर

Share Market: लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी कसा असतो शेअर बाजार? तेजी येईल की घसरण होईल?

SCROLL FOR NEXT