Due to the ongoing work on the railway bridge, the traffic jam is happening near the Nagina Masjid here esakal
नाशिक

Nashik News : मनमाडला वाहतूक कोंडीचा त्रास; नगिना मशिदीजवळ तयार झाला ब्लॅक स्पॉट

मनमाड- येवला मार्गावर असलेल्या पुलाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : मनमाड- येवला मार्गावर असलेल्या पुलाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र जाण्यास येण्यास दुसरा पर्यायी मार्ग नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे पुलाचे काम सुरू असले तरी मोकळ्या जागेतून मिळेल तेथून दुचाकी न्यावी लागत असल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.

नागरिक वैतागले असून कधी होणार यापुलाचे काम असा प्रश्न विचारीत आपली उद्विग्नता व्यक्त करीत आहेत. (Manmad suffer from traffic jam near Nagina Masjid nashik news)

मनमाड- येवला मार्गावर असलेला पुलाची संरक्षक भिंत एका बाजूने कोसळल्यामुळे तो वाहतुकीस बंद करून पुलाच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे. आमदार सुहास कांदे यांनी प्रयत्न करत या पुलासाठी तीन कोटी रुपये मंजूर करून आणले असून पुलाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

मात्र पूल बंद असल्याने शहराचे दोन भाग झाले आहे. जाण्यास येण्यास दुसरा कुठलाच पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. त्यामुळे दोन्ही भागातील नागरिकांना पायी जावे लागत आहे. विशेष म्हणजे वयोवृद्ध लोकांना अधिक त्रास जाणवत आहे. त्यामुळे दुचाकी तरी जाण्यासाठी जागा द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली होती. परंतु काम सुरू असल्याने दोन्ही बाजूंचे मार्ग बंद करण्यात आले आहे.

नागरिकांची गैरसोय होत असल्याने पुलावरून जाण्यास येण्यास मोकळ्या जागेतून मिळेल तेथून नागरिक पुलावरून जात आहे. त्यामुळे नगिना मशिदीजवळ मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. याबाबत फुले शाहू आंबेडकर मुस्लीम विचार मंचचे कार्याध्यक्ष फिरोज शेख, जावेद मन्सुरी यांनी वाहतूक कोंडीची दखल घेऊन प्रशासनाकडे मागणी केली आहे.

त्यांनी म्हटले आहेस की गेल्या काही महिन्यांपूर्वी कोसळलेल्या रेल्वे ओव्हर ब्रीजचा काही भाग आजपासून दुचाकी वाहनांना सुरू करून देण्यात आले. पण हे करण्यापूर्वी कुठल्याही प्रकारचे नियोजन प्रशासन तथा पोलिसा यंत्रणेने घेतली नाही. त्यामुळे नगिना मशिदीसमोर वाहतुकीची दुतर्फा कोंडी वाढली आहे. दुचाकी चालकांमध्ये हाणामारी, राडा होताना दिसत आहे. तातडीने याठिकाणी दोन्ही बाजूस वाहतुकीस आळा घालण्यासाठी पोलिस नेमण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Final, RCB vs GT live: गतविजेत्या बंगळुरूने इतिहास रचला! मुंबई इंडियन्सचा १३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, बनला पहिला संघ...

Suman Kalyanpur: भारतीय संगीतविश्वातील सुवर्णपान हरपले! ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन; संगीतविश्व शोकमग्न

Smoking करायला बंदी असताना सुद्धा विमानात ashtrays का असतात? जाणून घ्या यामागचं महत्त्वाचं कारण

SEBI म्युच्युअल फंड आणि डीमॅट नॉमिनेशनचे नियम बदलणार! सप्टेंबरपूर्वी पूर्ण करा 'हे' महत्त्वाचे काम

IPL 2026 Final, RCB vs GT live: वादग्रस्त निर्णयाने जीवदान मिळालेला वॉशिंग्टन नडला; गुजरातला सावरले, बंगळुरूसमोर ठिकठाक लक्ष्य

SCROLL FOR NEXT