K. T. Pawar
K. T. Pawar esakal
नाशिक

Marathi Song: ‘गाजला पाणदेव म्हणून गाजला’....गीत प्रदर्शित! ए. टींवर आधारित गौरव गीताला जिल्हाभरातून जोरदार प्रतिसाद

रवींद्र पगार

कळवण : माजी मंत्री स्वर्गीय ए. टी. पवार यांच्या जयंती निमित्त दळवट येथे प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते ए. टी. पवार यांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या आदिवासी सेवक डी. एम. गायकवाड लिखित ' साजला ए. टी. पवार, विकास पुरुष साजला, गाजला ए टी पवार, पाणदेव म्हणून गाजला.." हे गौरवगित प्रदर्शित करण्यात आले.

त्याला आज दिवसभरात कसमादेसह संपूर्ण जिल्ह्यातून जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. (Marathi Song Gajla Pandev mhnun Gajla song Released Strong response from all over district for Gauravgit based on ex minister KT Pawar nashik)

कळवण मतदारसंघाचे आठ पंचवार्षिक प्रतिनिधित्व करणाऱ्या व चार वेळा मंत्री म्हणून राहिलेल्या ए. टी. पवार यांनी कळवण मतदारसंघात रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षणाची गंगोत्री मतदारसंघात आणली.

मतदारसंघात शेकडो छोटे, मोठे लघुपाटबंधारे, पाझर तलाव व अर्जुन सागरच्या धरणाची निर्मिती करून मतदारसंघ सुजलाम् सुफलाम् केला. त्यामुळे कळवणसह जिल्हाभरात त्यांना पाणदेव म्हणून संबोधले जाते.

त्यांच्या विकास गाथेवर आधारित त्यांच्या आठवणींना उजाळा मिळावा म्हणून पवार यांचे निष्ठावंत कार्यकर्ते व आदिवासी सेवक डी. एम. गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी वरील गौरवगित साकारले.

आमदार नितीन पवार, शकुंतला पवार, माजी जि. प. अध्यक्षा जयश्री पवार, प्रा. गणेश शिंदे, जि. प. सदस्या गीतांजली पवार, नगराध्यक्ष कौतिक पगार, सभापती धनंजय पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र भामरे, जिल्हा परिषद सदस्य यशवंत गवळी, तहसीलदार रोहिदास वारुळे आदी अनावरणप्रसंगी उपस्थित होते.

हे गीत साकारण्यासाठी गीतकार व निर्माते डी. एम. गायकवाड, सहाय्यक निर्माता राजू पाटील, संजय सोनवणे, विशाल वाघ, छबूनाना कवर, सोमनाथ सोनवणे, रामदास पवार यांनी परिश्रम घेतले. या गीताला आवाज नाशिकचे प्रसिद्ध गायक व संगीतकार संजय गिते, सोर्स म्युझिक स्टुडिओ यांनी दिला.

योगेश विसपुते, योगेश ढुमसे यांनी कँमेरामन म्हणून काम पाहिले. गीत प्रदर्शित करण्यासाठी भूषण पगार यांनी सहकार्य केले. हे गीत प्रदर्शित होऊन युट्यूब व सोशल मिडियावर अपलोड होताच त्याला जोरदार प्रतिसाद मिळत आहे.

"मी स्वर्गीय ए. टी. पवार यांचे कार्य अगदी जवळून पाहिले आहे. त्यांच्यामुळेच आदिवासी भागात विकासगंगा वाहिली आणि आमचा तालुका सुजलाम् सुफलाम् केला. मला गितलेखनाचा अथवा निर्मितीचा कोणताही अनुभव नसताना माझ्याकडून त्यांच्या जीवनावर आधारित गितलेखनाचा व निर्मितीचा योग आला, हे मी माझे भाग्य समजतो."

- डी. एम. गायकवाड, आदिवासी सेवक, अभोणा

"ए. टी. पवार हे एक निगर्वी, साधे, मितभाषी असे व्यक्तिमत्त्व होते. त्यांना कळवण सुरगाणा मतदारसंघातील प्रश्नांची बारकाईने जाण होती. ते सोडविण्याची पद्धतही त्यांना माहीत होती. कामांचा पाठपुरावा करण्यासाठी लागणारे सातत्य व संयमही त्यांच्याजवळ होता, त्यामुळेच ते मतदारसंघाचा कायापालट करू शकले. त्यांच्या कार्याचा गौरव करणारे गीत नवीन पिढीला दिशादर्शक, मार्गदर्शक ठरणार आहे."

- नितीन पवार, आमदार, कळवण- सुरगाणा विधानसभा मतदारसंघ.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Lok Sabha Election : बाबाजी‘ फॅक्टरमुळे नाशिकमध्ये ‘काटे की टक्कर', शेवटच्या दोन दिवसात आले महत्व

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धुळ्यात एल एम सरदार हायस्कूल येथील ईव्हीएम बंद पडल्याने गोंधळ

Mobile Hacks: 'या' सोप्या ट्रिक्स वापरा, मोबाईलमधील फोटो डिलिट करण्याची येणार नाही वेळ

Lok Sabha Election: विरोधकांनीही मुस्लिम उमेदवारांना ठेवले दूर! 2019 च्या तुलनेत 2024 ची स्थिती काय?

RCB vs CSK: धोनीच्या षटकारामुळे रिंकूची आठवण... CSK विरूद्ध शेवटच्या ओव्हरला काय होत्या भावना, यश दयालच्या वडिलांकडून खुलासा

SCROLL FOR NEXT