नाशिक

Nashik Crime News: इगतपुरीच्या डेव्हिड टोळीच्या म्होरक्याविरोधात ‘मोका’

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News: इगतपुरीत खून, खुनाचा प्रयत्न, जबरी लुटमार करणाऱ्या व टोळीयुद्धातून सराईत गुंड संजय धामणे याचा खून करणऱ्या डेव्हिड टोळीविरोधात ‘मोका’न्वये (संघटित गुन्हेगारी) कारवाई करण्यात आलेली आहे. (Mcoca against David gang leader of Igatpuri nashik news)

आता या टोळीचा म्होरक्या व सराईत गुन्हेगार कवूभाई ऊर्फ फ्रान्सिस पॅट्रिक मॅनवेल याच्यावरही ‘मोका’न्वये कारवाई करण्यात आली. कवूभाईला २०२३ च्या प्रारंभी विक्रोळीतून अटक करण्यात आली होती.

डेव्हिड टोळीने डिसेंबर २०२० मध्ये सराईत गुंड संजय बबन धामणे (रा. देवळालीगाव) याचा खून केला होता. पोलिसांनी आशा पॅट्रिक मॅकवेल, सायमन पॅट्रिक मॅनवेल ऊर्फ छोटा पापा (वय २२), अजय पॅट्रिक मॅनवेल ऊर्फ आज्या (२७, दोघे रा. गायकवाडनगर, इगतपुरी), अजय ऊर्फ टकल्या राजू पवार (रा. बजरंगवाडी, इगतपुरी) यांच्यावर यापूर्वीच ‘मोकां’तर्गत कारवाई केली आहे. फरारी असलेल्या डेव्हिड गँगचा म्होरक्या कवूभाईला विक्रोळीत अटक केली होती.

दरम्यान, संशयित छोटा पापाचा भाऊ डेव्हिड याचा मृत संजय धामणेच्या गटाने खून केला होता. वर्चस्ववादातून झालेल्या या खुनानंतर कारागृहातून धामणे काही दिवसांसाठी बाहेर आला. त्या वेळी छोटा पापा, त्याची बहीण, भाऊ, आई व इतर तीन संशयितांनी मिळून संजय धामणेचा खात्मा केला होता.

पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरीचे पोलिस निरीक्षक राजू सुर्वे, स्थानिक गुन्हे शाखेचे हेमंत पाटील यांच्या पथकाने संशयितांना अटक केली. या टोळीवर संघटित गुन्हेगारीमुळे ‘मोकां’तर्गत कारवाई करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"भारताच्या भविष्यासाठी!" टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलची पोस्ट; इरफान पठाणही म्हणतो, कोणत्याही 'पेपर लीक'मुळे...

Paper Leak Fast-Track Courts: पेपरफुटीवर फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी; दोषींना कठोर शिक्षा होणार : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Mumbai News: मोतीलाल नगर पुनर्विकासाची मालकी म्हाडाकडेच; अदाणी फक्त विकासक, म्हाडाचे स्पष्टीकरण

Pune Treefall : स्वारगेट पोलिस लाइनमध्ये वडाचे प्रचंड झाड कोसळून १०-१५ दुचाकींचे नुकसान, २३ दिवसांत शहरात ३७२ झाडपडीच्या घटना

Pune Dry Waste Project: पुण्यात ३०० मेट्रिक टन सुका कचरा प्रकल्पाला स्थायीत बहुमताने मंजुरी; भाजप-काँग्रेस आमनेसामने

SCROLL FOR NEXT