Crime News esakal
नाशिक

Nashik Crime : 'मनसे'त प्रवेशासाठी पैसे मागणाऱ्या दिवेकरचा गळा चिरून खून; 'इतक्या' पैशांची केली होती मागणी

गुन्हे शाखा युनिट एकच्या (Crime Branch Unit) पथकानं संशयितांना अटक केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

घरात पार्टी करत असताना दिवेकर यानं मनसेमध्ये प्रवेश देण्यासाठी पंधरा हजारांची मागणी केली.

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (MNS) प्रवेश करून चांगलं पद देतो, असं सांगून पंधरा हजाराची मागणी केल्यामुळं तीन संशयितांनी प्रवीण दिवेकर या तरुणाचा खून केल्याचं निष्पन्न झालंय.

दरम्यान, गुन्हे शाखा युनिट एकच्या (Crime Branch Unit) पथकानं संशयितांना अटक केली आहे. या प्रकरणात संशयित तुषार पवार, चेतन देहाडे आणि एक अल्पवयीन बालकाचा समावेश आहे. प्रवीण दिवेकर याचा गळा चिरून खून करण्यात आला होता. जेलरोड इथं हा प्रकार घडला होता.

घरात पार्टी करत असताना दिवेकर यानं मनसेमध्ये प्रवेश देण्यासाठी पंधरा हजारांची मागणी केली. याला संशयित तुषार पवार यांनी नकार दिला. त्यामुळं दोघांमध्ये मोठा वाद झाला. त्यानंतर पवार व त्याच्या मित्राच्या मदतीनं दिवेकरचा खून केला.

गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकानं परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे माहिती काढून संशयितांचा माघ काढला आणि कसून चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली, अशी माहिती पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सौदी अरेबियाच्या संरक्षणासाठी पाकिस्तान 'येमेन'मधील हुथी बंडखोरांवर एअरस्ट्राईक करण्याच्या तयारीत; करार काय सांगतो?

Karmad News : आईच्या मामाच्या गावाला आलेल्या एकुलत्या एक मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

EPF Advance Rules : पीएफ खात्यातून पैसे काढायचे आहेत? आधी समजून घ्या नियम, कोणाला किती रक्कम मिळणार?

Marathi News Live Updates : भारत अन् श्रीलंकेत संरक्षण क्षेत्रातील तीन सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

Pune News : नैरोबीच्या महिलेला मिळाले पुण्‍यात जीवदान! अकरा शस्त्रक्रिया, अन्‌ परदेशी महिलेची मृत्यूशी झुंज यशस्‍वी

SCROLL FOR NEXT