नाशिक

Nashik Crime News : वडाळी नजीकच्या ‘त्या’ युवकाचा खूनच! खुनाच्या घटनेने वडाळी नजीक हादरले

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : निफाड तालुक्यातील वडाळी नजीक येथील तब्बल तीन दिवसांपासून बेपत्ता असलेला रोशन ज्ञानेश्वर झाल्टे याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत साकोरे मिग शिवारात एका विहिरीत आढळून आल्याने तो बेपत्ता नव्हता, तर त्याचा खूनच झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी उघडकीस आल्याने वडाळी नजीक गावात खळबळ उडाली आहे. (murder of youth near Wadali nashik crime news)

याबाबत पिंपळगाव पोलिसांनी तत्काळ सूत्रे फिरवत आरोपी ऋषीकेश घुमरे (रा. उंबरखेड), ओमकार डेर्ले (रा, उंबरखेड रोड, पिंपळगाव बसवंत) या दोघांना बेड्या ठोकल्या असून, त्यास पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी खुनाची कबुली दिली आहे. रात्री उशिरा पिंपळगाव पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

निफाड तालुक्यातील वडाळी नजीक येथील युवक रोशन झाल्टे हा मंगळवार (ता. १७) सकाळपासून घरून कामानिमित्त गेला तसा अद्यापही परतला नव्हता. पिंपळगाव पोलिस ठाण्यामध्ये तो बेपत्ता असल्याबाबत तक्रार देखील दाखल करण्यात आली होती.

मात्र शुक्रवार (ता. २०) त्याचा मृतदेह साकोरे मिग शिवारातील एका विहिरीत संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने त्याची आत्महत्या नव्हे तर त्याचा खूनच झाल्याचा प्राथमिक माहिती प्रत्यक्षदर्शी परिस्थिवरून पोलिस तपासात उघडकीस आल्याने वडाळी नजीक गावात खुनाच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

पिंपळगाव पोलिसांनी तत्काळ सूत्रे फिरवीत आरोपी ऋषीकेश घुमरे व ओमकार डेर्ले यास अटक केली असून, त्यांनी रोशन झाल्टे याच्या डोक्यात फावडे मारून मृतदेह दगड बांधून साकोरे मिग शिवारातील विहिरीत फेकल्याची कबुली दिली आहे. नाशिक ग्रामीणचे पोलिस उपविभागीय अधिकारी सुनील भामरे यांनी खुनेच्या घटनेचा आढावा घेतला. पिंपळगाव बसवंत पोलिस स्टेशनचे निरीक्षक अशोक पवार अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

IND vs WI 2nd ODI : वादाला निमित्त! OUT or NOT OUT? नमन धीरचा अफलातून झेल, पण विंडीजला तो नाही पटला... Video पाहून ठरवा

Maratha Reservation: अंतरवालीमधील कोणी टीका केली तर दुर्लक्ष करा ; जरांगे . गावाचे योगदान विसरणार नाही

Latest Marathi News Live Update : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी सिरीवेल्ली प्रसाद पाच दिवस मुंबई दौऱ्यावर; बैठकांना सुरुवात

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

SCROLL FOR NEXT