Naresh Karda Expectation of cooperation from customers nashik news
Naresh Karda Expectation of cooperation from customers nashik news esakal
नाशिक

Nashik News : ग्राहकांकडून सहकार्याची अपेक्षा : नरेश कारडा

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : सध्या आमच्यावर आलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे ज्या-ज्या ग्राहकांच्या व्यवहारात आमच्याकडून बाधा निर्माण झाली आहे, ते आम्ही हळूहळू निवळत आहोत.

कारडा कन्स्ट्रक्शनच्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीत आम्हाला आमच्या ग्राहकांकडून सहकार्याची अपेक्षा आहे, असे कारडा कन्स्ट्रक्शनचे कार्यकारी संचालक नरेश कारडा यांनी सांगितले. (Naresh Karda Expectation of cooperation from customers nashik news)

कारडा कन्स्ट्रक्शनचे कार्यकारी संचालक कारडा यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, की कारडा कन्स्ट्रक्शन गेली २८ वर्षे नाशिकमध्ये कार्यरत आहे. गेल्या २८ वर्षांत आम्ही ७० व अधिक प्रकल्पांचे पझेशन वेळोवेळी दिले. त्या माध्यमातून कारडा कन्स्ट्रक्शनबरोबर पाच हजारांपेक्षा जास्त ग्राहक वर्ग जुळला गेलेला आहे.

सध्या आमचे १२ प्रकल्प सुरू असून, त्यांचेही काम सुरू आहे. सुरू असलेल्या प्रकल्पाचे पझेशनही आम्ही देणार आहोत.

सध्या कारडा कन्स्ट्रक्शनची आर्थिक परिस्थिती खालावली असल्याकारणाने सदरील १२ प्रकल्पांचे पझेशन देण्यास विलंब होत आहे. असे असले, तरीही आम्ही सदरील प्रकल्पाचे पझेशन देण्यास बांधील आहोत.

आम्ही आमच्या सर्व ग्राहकांची त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करीत आहोत. सध्या आमच्यावर आलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे ज्या-ज्या ग्राहकांच्या व्यवहारात आमच्याकडून बाधा निर्माण झाली आहे, ते आम्ही हळूहळू निवळत आहोत. कारडा कन्स्ट्रक्शनच्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीत आम्हाला आमच्या ग्राहकांकडून सहकार्याची अपेक्षा आहे. सध्याच्या परिस्थितीमधून आम्ही लवकरच बाहेर पडू, असा विश्‍वास कारडा यांनी व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुख्यमंत्री शिंदेंच्या गडात सर्वात कमी मतदान? जाणून घ्या ५ वाजेपर्यंत महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी

Ebrahim Raisi : इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमुळं भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Helmet Man : दागिने, घर, जमीन विकून हा व्यक्ती लोकांना फुकटात वाटतोय हेल्मेट,राघवेंद्रचे होतंय कौतूक

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

SCROLL FOR NEXT