Education Survey esakal
नाशिक

Nashik Education Survey: 12 महाविद्यालयांनी शिक्षण सर्वेक्षणाची माहिती दिली नाही! शहरातील 8, ग्रामीणमधील 4 महाविद्यालयांचा समावेश

Nashik News : अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षणांसंदर्भात (एआयएसएचई) माहिती सादर करण्याबाबत जिल्‍हाभरातील काही महाविद्यालयांकडून उदासीनतेचे दर्शन घडत आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षणांसंदर्भात (एआयएसएचई) माहिती सादर करण्याबाबत जिल्‍हाभरातील काही महाविद्यालयांकडून उदासीनतेचे दर्शन घडत आहे. जिल्ह्या‍तील एकूण १२ महाविद्यालयांनी अद्याप ही माहिती सादर केलेली नसून, निर्धारित मुदतीत २० मार्चपर्यंत माहिती सादर करण्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने या महाविद्यालयांना स्‍मरणपत्र पाठविले आहे. (Nashik colleges not report education survey marathi news)

माहिती सादर न केलेल्‍या बारापैकी आठ महाविद्यालये नाशिक शहरातील, तर उर्वरित चार हे ग्रामीण भागातील आहेत. मोठ्या शैक्षणिक संस्‍थांच्‍या महाविद्यालयांनी ही माहिती सादर केलेली नाही. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ ची अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षण कार्यक्रमाची माहिती ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी ५ जानेवारीपासून लिंक उपलब्‍ध केलेली असून, त्यासाठी २० मार्चपर्यंत अंतिम मुदत दिलेली आहे.

बहुतांश महाविद्यालयांनी माहिती सादर केलेली आहे. मात्र अद्यापपर्यंत माहिती सादर न केलेल्‍या महाविद्यालयांची नावे पुणे विद्यापीठाने जारी केलेली आहेत. एकूण ७५ महाविद्यालयांच्‍या यादीतील सर्वाधिक महाविद्यालये पुणे जिल्ह्यातील आहेत. त्‍यापाठोपाठ नगर व नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयांचा समावेश आहे. (Latest Marathi News)

प्राचार्य, नोडल अधिकारी जबाबदार

संबंधित महाविद्यालयांनी माहिती वेळेत न भरल्‍यास भविष्यात होणाऱ्या नुकसानीस संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य, संचालक व नोडल अधिकारी जबाबदार राहातील, असे विद्यापीठाने स्‍पष्ट केले आहे. वेबपोर्टलवर ऑनलाइन माहिती भरण्याच्‍या सूचना विद्यापीठाने केल्‍या आहेत.

सर्वेक्षणात या बाबींचा आहे समावेश

देशातील उच्च शिक्षणाची स्थिती चित्रित करण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने २०१०-११ पासून अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षण आयोजित केले जाते. या सर्वेक्षणात उच्च शिक्षण देणाऱ्या देशातील संस्थांमधील शिक्षक, विद्यार्थी नोंदणी, कार्यक्रम, परीक्षा निकाल, शैक्षणिक वित्त, पायाभूत सुविधा अशा अनेक बाबींवर डेटा संकलित केला जातो.

शैक्षणिक विकासाचे निर्देशक जसे की, संस्था घनता, एकूण नोंदणी गुणोत्तर, विद्यार्थी-शिक्षक गुणोत्तर, लिंग समानता निर्देशांक, प्रतिविद्यार्थी खर्च आदी माहिती गोळा केली जाते व या माहितीच्‍या आधारे धोरणात्‍मक निर्णय घेतले जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT