Nashik News : नाशिक जिल्हा वार्षिक योजनेचा 77 टक्के खर्च! जिल्हा नियोजन समितींकडून 89 टक्के खर्च

Nashik News : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कुठल्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असल्याने प्रशासनामध्ये निधी खर्चाची लगीनघाई सुरू आहे.
DPC Fund
DPC Fundesakal

नाशिक : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कुठल्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असल्याने प्रशासनामध्ये निधी खर्चाची लगीनघाई सुरू आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हा नियोजन समितीने २०२३-२४ या आर्थिक वर्षात आतापर्यंत ७७.१६ टक्के खर्च केला आहे. तर त्यांना प्राप्त झालेल्या निधीपैकी ९१.९४ टक्के निधी वितरित केला आहे. त्यामुळे विभागात नाशिक जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. (Nashik expenditure of District Annual Plan marathi news)

राज्यातील ३६ जिल्हा नियोजन समित्यांना २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी दिलेल्या १५ हजार १५० कोटी रुपयांच्या निधीतून आतापर्यंत ७९ टक्के व वितरित केलेल्या निधीच्या ८९ टक्के निधी खर्च केला आहे. या सर्व जिल्हा नियोजन समित्यांनी त्यांना प्राप्त झालेल्या निधीतून जवळपास ८९ टक्के निधी संबंधित विभागांना वितरित केला आहे.

नाशिक जिल्हा नियोजन समितीला सर्वसाधारण योजनेतून २०२३-२४ या आर्थिक वर्षात ६८० कोटी रुपये निधी प्राप्त झाला होता. त्यापैकी ६२५ कोटी रुपये म्हणजे ९२ टक्के निधी जिल्हा परिषद व इतर कार्यान्वयीन यंत्रणांना वितरित झाला असून, आतापर्यंत ५२४ कोटी रुपये म्हणजे ७७ टक्के निधी खर्च करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

DPC Fund
Nashik ZP News : जि. प. च्या नव्या इमारतीच्यावाढीव कामासाठी 40 कोटी

नाशिक विभागात धुळे जिल्हा नियोजन समितीने आघाडी घेतली असून, आतापर्यंत २६५ कोटी प्राप्त निधीतून २४९ कोटी रुपये निधी वितरित केला आहे. त्यांनी आतापर्यंत २१२ कोटी रुपये खर्च केले आहेत. नाशिक विभागात नंदुरबार, जळगाव व नगर या जिल्हा नियोजन समित्यांनी अनुक्रमे ८९ टक्के, ७५ टक्के व ७४ टक्के निधी वितरित केला आहे.

निधी वितरणात नाशिक दुसऱ्या स्थानी

जिल्हा नियोजन समितीला प्राप्त झालेल्या निधीपैकी वितरित झालेल्या निधीच्या आधारे नाशिक जिल्ह्याचा राज्यात १७ वा क्रमांक लागतो. पण विभागात नाशिकने दुसऱ्याच स्थानी झेप घेतली आहे. धुळे प्रथम स्थानावर दिसतो, तर नंदुरबार, जळगाव व अहमदनगर अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या स्थानी आहे.

DPC Fund
Nashik ZP School News : जि. प. शाळांत 219 वर शिक्षकांची आज नियुक्ती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com