Nashik ZP School News : जि. प. शाळांत 219 वर शिक्षकांची आज नियुक्ती

Nashik News : पडताळणी झाल्याने या शिक्षकांना शनिवारी (ता.९) समुपदेशन पद्धतीने पदस्थापना दिली जाणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. नितीन बच्छाव यांनी दिली.
Teacher
Teacheresakal

नाशिक : पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीची सर्व प्रक्रिया ऑनलाइन पार पाडून पहिल्या टप्प्यात जिल्ह्याला प्राप्त झालेल्या शिक्षक यादीतील शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली आहे. पडताळणी झाल्याने या शिक्षकांना शनिवारी (ता.९) समुपदेशन पद्धतीने पदस्थापना दिली जाणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. नितीन बच्छाव यांनी दिली. (Nashik ZP schools teachers marathi news)

डी. एड., बी. एड. या व्यावसायिक पात्रतेसह अभियोग्यताधारक टीईटी, सीटीईटी परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या पात्र बेरोजगारांसाठी पहिल्या टप्प्यात पवित्र पोर्टलवर १६ ऑक्टोबर २०२३ ते २२ जानेवारी २०२४ या कालावधीत नोंद केलेल्या २१ हजार ६७८ रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यात मुलाखतीशिवाय १६ हजार ७९९ व मुलाखतीसह चार हजार ८७९ अशा एकूण २१ हजार ६७८ रिक्त पदांच्या पदभरतीची कार्यवाही सुरू आहे.

त्यानुसार गुणवत्तेसह सर्व प्रकारच्या आरक्षणानुसार ११ हजार ८५ उमेदवारांची गुणवत्तायादी प्रसिद्ध केली आहे. शाळांवर नियुक्तीसाठी शिफारस केली आहे. शिक्षक पदभरतीसाठी पवित्र पोर्टलवर ३२० पदांच्या जाहिरातीनुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ मध्ये प्राप्त गुणांच्या आधारे पवित्र पोर्टलवर एकूण २३० उमेदवारांची गुणवत्तायादी प्रसिद्ध केली होती.

गुणवत्ता यादीतील उमेदवारांच्या अपलोड केलेल्या कागदपत्रानुसार, मूळ कागदपत्रांची तपासणी/पडताळणी ४ व ५ मार्चला शासकीय माध्यमिक कन्या विद्यालयात झाली. त्यानंतर यादीतील १ ते २१९ पात्र उमेदवारांची शनिवारी समुपदेशन पदस्थापना प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. (Latest Marathi News)

Teacher
Nashik News : ग्रामीण पोलिसांच्‍या ताफ्यात 20 चारचाकी वाहने दाखल

गंगापूर रोडवरील होरायझन ॲकॅडमी सीबीएसई बिल्डिंग (केबीटी इंजिनिअरिंग कॉलेजसमोर) येथे ही प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यासाठी मूळ कागदपत्रांसह सकाळी दहाला उपस्थित राहावे. या दिवशी गैरहजर राहिल्यास संबंधित उमेदवाराचा नंतर विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी, असे शिक्षणाधिकारी डॉ. बच्छाव यांनी सांगितले.

बिगरआदिवासी तालुक्यांचे काय?

आदिवासी भागातील प्राथमिक शाळांच्या तुलनेत बिगरआदिवासी तालुक्यातील शाळांमध्ये रिक्त जागांची संख्या मोठी आहे. यातही नांदगाव, मालेगाव, येवला, चांदवड या तालुक्यांत शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे या भागातील शाळांना शिक्षक मिळावे, अशी मागणी होत आहे.

Teacher
Nashik ZP News : जि. प. च्या नव्या इमारतीच्यावाढीव कामासाठी 40 कोटी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com