sakal exclusive
sakal exclusive sakal
नाशिक

Nashik News : जिल्ह्यातील 72 जलस्रोतांचे पाणी दूषित; जि. प. पाणी व स्वच्छता विभाग तसेच आरोग्य विभाग अलर्ट

सकाळ वृत्तसेवा

विकास गामणे : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्ह्यात टँकरची संख्या वाढत असताना दुसरीकडे ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे, त्यातीलही जलस्रोत दूषित असल्याचे आढळून आले. जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधील दोन हजार २३२ पाण्याचे नमुने तपासले असता यातील ७२ जलस्रोतांमध्ये दूषित पाणी आढळून आले आहे. यात सर्वाधिक प्रमाण बागलाण व त्र्यंबकेश्वर तालुक्यांत आहे. बागलाणमध्ये १५ जलस्रोतांमध्ये दूषित पाण्याचे नमुने आढळून आले. (Nashik 72 water sources in district are contaminated marathi News)

एकूण दोन हजार २३२ पाण्याचे नमुने तपासण्यात आले होते, म्हणजे तपासण्यात आलेल्यांपैकी तीन टक्के स्रोत दूषित आढळले असल्याचे जिल्हा आरोग्य विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, आरोग्य विभागाने याची गंभीर दखल घेतली असून, पंचायत समिती व ग्रामपंचायतींना या संदर्भात लेखी सूचना केल्या आहेत.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील जलस्रोतांची अणुजैविक तपासणी करण्यात येते. या तपासणीअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक जलस्रोताचे दर महिन्याला जलसुरक्षा रक्षकामार्फत पाणी नमुने गोळा करून ते तपासणीकरिता जिल्हा प्रयोगशाळेत पाठविले जातात. जिल्हा प्रयोगशाळेत पाणी नमुन्यांची तपासणी केल्यावर दूषित नमुन्यांबाबत आरोग्य विभागाला पत्र देण्यात येते.

दूषित जलस्रोतांचे आरोग्य विभागामार्फत शुद्धीकरण करून पुन्हा तपासणी केली जाते. जैविक पाणी नमुने तपासणीत दूषित पाणी नमुने गावांची संख्या वाढत आहे. मार्च २०२४ च्या अहवालानुसार जिल्ह्यातील पाच गावांचे ब्लिचिंग पावडर नमुने हे २० टक्क्यांपेक्षा कमी क्लोरिन उपलब्धता असल्याचे आढळून आले; तर ७२ गावांचे पाणी नमुने पिण्यास अयोग्य असल्याचे समोर आले आहे..(latest marathi news)

जिल्ह्यात दुष्काळाचे संकट असून, पिण्यासाठी गावागावांत टॅंकर सुरू आहेत. टंचाईग्रस्त गावांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यातच दूषित पाण्याचे नमुने आढळले आहेत. त्यामुळे गावातील ग्रामस्थ दूषित पाणी पीत असल्याने यातून वेगवेगळ्या आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.

अशी आहे दूषित पाण्याची टक्केवारी

त्र्यंबकेश्वर (९ टक्के), चांदवड (१ टक्का), मालेगाव (६ टक्के), बागलाण (५ टक्के), दिंडोरी (४ टक्के), कळवण (३ टक्के), देवळा (२ टक्के), नांदगाव (७ टक्के), सिन्नर (८ टक्के), पेठ (४ टक्के).

दूषित पाणी पिणारी गावे ! (कंसात जलस्रोतांची संख्या)

कळवण : पाळे बु., कळमथे पा., आठंबा (३), साकोरा (२), नांदुरी, गोबलपूर

बागलाण : आराई (३), गोळवाड (७)

मालेगाव : देवरपाडे, अस्ताने, डोंगराळे, वडनेर, कोठुरे बुद्रुक, सोनज, खलाणे, निमगाव, मेहुणे

नांदगाव : मांडवड, लक्ष्मीनगर, बेजगाव, पानेवाडी, हिसवळ बुद्रुक, खिर्डी, कासारी

चांदवड : डोंगरगाव

देवळा : मटाणे (२), राहुडे

पेठ : रानपाडा, करंजखेड, फणसपाडा, चोळमुख, आमलोण

दिंडोरी : आंबेदिंडोरी (४)

सिन्नर : मोहदरी (२), निऱ्हाळे (३), वडांगळी, खडांगळी, कोमलवाडी, चोंढी, दत्तवाडी, सोमठाणे

त्र्यंबकेश्वर : पक्याचा पाडा, बांगरवाडी, झारवाड, लव्हाळईपाडा (२), रोहिले, साप्ते, कोणे, वेळे, सोमनाथनगर, शिवाजीनगर, गडदावणे, फणसवाडा

जलस्रोतांची सुरू आहे तपासणी

जिल्हा परिषदेच्या आरोग्य आणि पाणी व स्वच्छता विभागातर्फे स्वच्छता सर्वेक्षण मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील १० हजार ३२५ जलस्रोतांची (यात नळपाणी पुरवठा योजनेचे चार हजार ६१३, तर हातपंप, सार्वजनिक विहिरी पाच हजार ७१२ असे एकूण १० हजार ३२५ स्रोतांचे पाणी नमुने गोळा केले जाणार आहेत) तपासणी केली जाणार असून, त्यासाठी १ एप्रिलपासून मोहीम सुरू झाली आहे.

३० एप्रिलपर्यंत ही तपासणी मोहीम सुरू असेल. या मोहिमेत जलस्रोतांच्या गुणवत्तेनुसार लाल, पिवळे आणि हिरवे कार्ड ग्रामपंचायतींना दिले जाणार आहे. या स्वच्छता सर्वेक्षण अभियानात सदर अभियानाबरोबरच जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण करण्यात येईल.

''जिल्ह्यात पाणीटंचाई परिस्थिती असल्याने टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्रोतांची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. स्रोतांचे पाणी वापरण्यापूर्वी त्याची जैविक व रासायनिक तपासणी नियमित करावी. पिण्यास अयोग्य असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांसमोर पिण्याचे पाणी भरू नये, असे फलक लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.''- दीपक पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पाणी व स्वच्छता विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

Crime News: 200 सीसीटीव्हींची पडताळणी अन् दातांचे निशाण! पोलिसांनी असा शोधून काढला बलात्काराचा आरोपी

Sahara Group: सहारा समूहाने 'स्कॅम 2010' वेब सीरिजवर कायदेशीर कारवाईची दिली धमकी; काय आहे कारण?

Kalyan Lok Sabha : 'मतदान केलं नाही तर पगार कापला जाणार..'; मतदार यादीत नावच सापडत नसल्याने मतदार रडकुंडीला!

SCROLL FOR NEXT