Citizens protesting at Ambad Police Station on Tuesday demanding closure of brothel in Pawan Nagar area.
Citizens protesting at Ambad Police Station on Tuesday demanding closure of brothel in Pawan Nagar area. esakal
नाशिक

Nashik News : पवननगर परिसरातील कुंटणखाना बंदसाठी ठिय्या

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : पवन नगर परिसरातील एका इमारतीमध्ये राहत्या घरात अनेक दिवसांपासून कुंटणखाना खुलेआम सुरू असल्याने परिसरातील महिला व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या ठिकाणी येणारे युवक तसेच ग्राहक आजूबाजूच्या नागरिकांच्या घरांमध्ये पत्ता विचारतात, यामुळे आजूबाजूला राहणारे नागरिक अक्षरशः हैराण झाले असून या ठिकाणी अवैध सुरू असलेला कुंटणखाना पोलिसांनी तत्काळ बंद करण्याच्या मागणीसाठी स्थानिकांनी अंबड पोलिस ठाण्याच्या आवारात मंगळवारी (ता.२७) ठिय्या दिला. (Citizens protest for close of brothel in Pawan Nagar area)

तसेच मागणीचे निवेदन देत आंदोलनाचा इशाराही महिलांनी दिला आहे. पवन नगर येथील गणपती मंदिराच्या बाजूला सिडकोच्या एका इमारतीमध्ये वर्षानुवर्षे अवैध देहविक्री व्यवसाय सुरू आहे. एक महिला इतर महिलांना पैशाचे आमिष दाखवून या व्यवसायात उतरण्यास भाग पाडत असून या ठिकाणी मोठा कुंटणखाना सुरू झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

सकाळी तसेच रात्रीच्या वेळी काही समाजकंटक तसेच मद्यपान करून येणारे युवक आरडाओरड करतात, गुंड प्रवृत्तीचे लोक या ठिकाणी येऊ लागले आहेत. यामुळे आजूबाजूला राहणाऱ्या महिला वर्गासह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. (latest marathi news)

परिसरातील मुलींच्या छेडछाडीचे प्रकार वाढले आहेत. यामुळे येथील अवैध व्यवसाय तत्काळ बंद करावा, यासाठी अंबड पोलिस ठाण्यात ३० ते ४० नागरिकांनी मोर्चा काढला. पोलिसांना नागरिकांनी निवेदन देत तत्काळ अवैध व्यवसाय बंदची मागणी केली आहे.

याप्रसंगी जयश्री शिनकर, ललिता पाटील, नंदिनी पाटील, वनिता वाणी, यशस्वी कोरडकर, निशा आंबेकर, भारतीय शिंपी, तृप्ती वाशिमकर, साक्षी पाडगावकर यांच्यासह परिसरातील शेकडो नागरिकांच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: डोंबिवलीत ईव्हीएम मशीन पडले बंद

IPL 2024 Playoffs : प्लेऑफसाठी नाही कोणत्या राखीव दिवस; पावसामुळे खेळखंडोबा झाला तर कसा लागणार निकाल?

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

SCROLL FOR NEXT