HSC Exam
HSC Exam  esakal
नाशिक

HSC Exam 2024 : मराठीच्‍या पेपरला घोटीत आढळले 2 कॉपीबहाद्दर

सकाळ वृत्तसेवा

HSC Exam 2024 : इयत्ता बारावीच्‍या परीक्षेत शुक्रवारी (ता. २३) सकाळ सत्रात झालेला मराठी हा भाषा विषयाचा पेपर बहुतांश विद्यार्थ्यांना सोपा गेला. दरम्‍यान, जिल्ह्यातील घोटी येथील परीक्षा केंद्रावर कॉपी करताना आढळल्‍याने दोन विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. नाशिक विभागात इतर कुठेही गैरप्रकार आढळला नसल्‍याचे शिक्षण मंडळातर्फे सांगण्यात आले. (nashik HSC Exam 2024 marathi news)

फेब्रुवारी-मार्च २०२४ सत्रातील बारावीच्‍या लेखी परीक्षेला उत्‍साहात सुरवात झाली. पहिल्‍या टप्प्यात भाषा विषयांचे पेपर पार पडत आहेत. इंग्रजी, हिंदीनंतर शुक्रवारी सकाळच्‍या सत्रात मराठी व इतर प्रादेशिक भाषा विषयांची परीक्षा घेण्यात आली. दुपारच्‍या सत्रात ऊर्दू आणि फ्रेंच, स्‍पॅनिश, पाली या भाषांची परीक्षा नियोजित होती. नाशिक विभागातून सुमारे एक लाख १६ हजार विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले होते.

मराठीच्‍या पेपरला घोटी येथील केंद्रावर दोन कॉपीबहाद्दर आढळून आले. उर्वरित कुठेही गैरप्रकार आढळला नाही. दरम्‍यान, शिक्षण विभागातर्फे विविध पथकांच्‍या माध्यमातून केंद्रांना भेटी दिल्‍या जात आहेत. परीक्षेच्‍या या पुढील टप्प्‍यात शाखानिहाय विशेष विषयांचे पेपर पार पडणार असून, विद्यार्थ्यांकडून उजळणीवर भर दिला जातो आहे. (latest marathi news)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Lok Sabha Election : बाबाजी‘ फॅक्टरमुळे नाशिकमध्ये ‘काटे की टक्कर', शेवटच्या दोन दिवसात आले महत्व

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धुळ्यात एल एम सरदार हायस्कूल येथील ईव्हीएम बंद पडल्याने गोंधळ

Mobile Hacks: 'या' सोप्या ट्रिक्स वापरा, मोबाईलमधील फोटो डिलिट करण्याची येणार नाही वेळ

Lok Sabha Election: विरोधकांनीही मुस्लिम उमेदवारांना ठेवले दूर! 2019 च्या तुलनेत 2024 ची स्थिती काय?

RCB vs CSK: धोनीच्या षटकारामुळे रिंकूची आठवण... CSK विरूद्ध शेवटच्या ओव्हरला काय होत्या भावना, यश दयालच्या वडिलांकडून खुलासा

SCROLL FOR NEXT