Guardian Minister Dada Bhuse, Legislative Assembly Deputy Speaker Narahari Jirwal, District Magistrate Jalaj Sharma, District Chief Executive Officer Ashima Mittal etc. while taking information in the water review meeting at Nijojan Bhawan.
Guardian Minister Dada Bhuse, Legislative Assembly Deputy Speaker Narahari Jirwal, District Magistrate Jalaj Sharma, District Chief Executive Officer Ashima Mittal etc. while taking information in the water review meeting at Nijojan Bhawan. esakal
नाशिक

Nashik News : त्र्यंबकेश्वर, इगतपुरीच्या धरणांतून पाणी सोडणे बंद करा! आमदार हिरामण खोसकर

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : धरणांचे तालुके म्हणून ओळख असलेल्या त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यांत तीव्र पाणीटंचाई भासत असताना येथील धरणांमधून सोडण्यात येणारे पाणी तत्काळ थांबवा. अन्यथा, लोक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत, अशी मागणी आमदार हिरामण खोसकर यांनी केली. पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन हॉलमध्ये शुक्रवारी (ता. २३) टंचाईची आढावा बैठक घेतली. (Nashik MLA Hiraman Khoskar statement of Stop releasing water marathi news)

या वेळी विधानसभा उपसभापती नरहरी झिरवाळ, खासदार हेमंत गोडसे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिका आयुक्त अशोक करंजकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल व्यासपीठावर उपस्थित होते. आमदार खोसकर, नितीन पवार वगळता शहर आणि जिल्ह्यातील एकही आमदार या बैठकीला उपस्थित नव्हते. भाम, भावली, मुकणे धरणातून पाणी सोडले जात असल्याच्या तक्रारी असल्याचे खासदार गोडसे यांनी सांगितले.

स्थानिकांवर अन्याय होऊ न देता पाण्याचे नियोजन करा, पाणीपुरवठ्याबाबत लवकरच स्वतंत्र बैठक बोलवा अशा सूचना पालकमंत्र्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या. जिल्ह्यातील धरणांमधील साठा कमी होतो आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा सर्वच धरणांमध्ये कमी प्रमाणात पाणी उपलब्ध आहे.

याबाबतची माहिती पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनाली शहाणे यांनी दिली. आचारसंहिता लागू झाली की अधिकृत बैठका घेता येणार नाहीत; परंतु पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्या, पिण्यासाठी कुठेही पाणी कमी पडणार नाही याची खबरदारी घ्या, असे निर्देश भुसे यांनी दिले. अलनिनोच्या प्रभावामुळे ऑगस्ट २०२४ अखेरपर्यंत उपलब्ध पाण्याचे नियोजन करा, अशा सूचना त्यांनी केल्या.

ऑगस्टअखेरपर्यंत पिण्यासाठी पाणी

ऑगस्टअखेरपर्यंत पिण्यासाठी पुरेल असे पाण्याचे नियोजन करा, अशा राज्य सरकारच्या सूचना आहेत. पाणीसाठा कमी प्रमाणात शिल्लक असताना हातघाईवर येण्यापेक्षा आतापासूनच पाणीकपातीचे नियोजन करा, अशा सूचना पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या.

पालकमंत्र्यांच्या सूचना

- नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे

- शेतीचे पाणी वाया जाणार नाही, याची काळजी घ्या

- फळबागांना प्राधान्याने पाणी द्यावे

- पाणीकपातीची गरज असेल तेथे काळजी घेऊन नियोजन करा

- मालेगावला दोन दिवसांनी पाणीपुरवठा (latest marathi news)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT