City Transport (file photo)
City Transport (file photo) esakal
नाशिक

Nashik Hanuman Jayanti : वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा करावा अवलंब; हनुमान जयंती आज

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शहरात हनुमान जयंती मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात साजरी केली जाते. यानिमित्त शहरात मंगळवारी (ता. २३) ठिकठिकाणी मिरवणुका व महाप्रसादाचे वाटप होणार आहे. या पार्श्वभूमीवर भद्रकाली व पंचवटी पोलिस ठाणे हद्दीमध्ये भाविकांची गर्दी होण्याची शक्यता असल्यामुळे मिरवणूक मार्गावरील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले असून. (Nashik Motorists should take alternative routes due to Hanuman Jayanti)

वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचा उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी केले आहे. पंचवटी भागातून मोठ्या प्रमाणात मिरवणुकींचे आयोजन करण्यात आलेले आहे. पंचवटी व भद्रकालीतील रस्त्यांची रुंदी पाहता वाहतूक कोंडीची शक्यता आहे. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये.

यासाठी शहर पोलिसांकडून जादा बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. त्याचप्रमाणे अरुंद रस्त्यांवर मिरवणुका निघणार असल्याने वाहतूक कोंडी होऊन समस्या निर्माण होण्याचीही शक्यता आहे. त्यापार्श्‍वभूमीवर पोलिसांनी मिरवणूक मार्गावरील वाहतूक पर्यायी रस्त्यावरून वळविली आहे. त्यात वझरे मारुती मंदिर, चौक मंडई, भद्रकाली दूध बाजार, बादशाही कॉर्नर, गाडगे महाराज पुतळा, धुमाळ पॉइंट. (latest marathi news)

सांगली बॅंक सिग्नल, मेहेर, अशोकस्तंभ, रविवार कारंजा, मालेगाव स्टॅण्ड, रामकुंड या मार्गाने मिरवणुका निघणार आहेत. हा मिरवणूक मार्ग वाहतुकीसाठी दुपारी ३ वाजेपासून मिरवणूक संपेपर्यंत बंद असेल. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी वाहतूक मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन खांडवी यांनी केले आहे.

पर्यायी मार्ग

* बागवानपुरा पोलिस चौकी ते अमरधाम रोड ते पंचवटी

* सारडा सर्कल ते खडकाळी सिग्नल, मोडक सिग्नल, शालिमार, सीबीएस, कॅनडा कॉर्नर, जुना गंगापूर नाका, चोपडा लॉन्स, पंचवटी

* पंचवटी कारंजाकडून येणारी वाहतूक मखमलाबाद नाका, चोपडा लॉन्स, जुना गंगापूर नाका

* सीबीएसकडून पंचवटीकडे जाणारे मेहेर सिग्नल, अशोक स्तंभ, घारपुरे घाट, रामवाडी पूल, मखमलाबाद मार्गे पंचवटीकडे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal PM Pushpa Kamal Dahal : नेपाळच्या पंतप्रधानांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ३ वाजेपर्यंत फक्त ३६.०७ टक्के मतदान, सर्वाधिक मतदान कुठे?

Randeep Hooda: 'स्वातंत्र्य वीर सावरकर' ओटीटीवर होणार रिलीज; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या...

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

ICMR On Side Effects Of Covaxin: Covaxin च्या दुष्परिणामांबाबतचे आरोप खोटे? समोर आले नवे अपडेट; ICMR ने अहवालावर उपस्थित प्रश्न केले

SCROLL FOR NEXT