Nashik Citylinc Bus (file photo) esakal
नाशिक

Nashik Citylinc Bus : सिटीलिंकला राष्ट्रीय ‘रोड सेफ्टी’ पुरस्कार

Nashik Citylinc Bus : ‘सिटीलिंक कनेक्टिंग नाशिक’ शहर बससेवेला असोसिएशन ऑफ स्टेट रोड ट्रान्स्पोर्ट अंडरटेकिंग या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेतर्फे रोड सेफ्टी पुरस्कार जाहीर करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Citylinc Bus : महापालिकेकडून चालविल्या जाणाऱ्या ‘सिटीलिंक कनेक्टिंग नाशिक’ शहर बससेवेला असोसिएशन ऑफ स्टेट रोड ट्रान्स्पोर्ट अंडरटेकिंग या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेतर्फे रोड सेफ्टी पुरस्कार जाहीर करण्यात आला. १५ मार्चला दिल्लीला पुरस्काराचे वितरण होईल.

महापालिकेकडून नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. अर्थातच सिटीलिंक कंपनीची स्थापना करण्यात आली. (Nashik National Road Safety Award for citylinc bus service)

८ जुलै २०२१ पासून सिटीलिंक बससेवा सुरू झाली. सध्या शहरात २५० बस चालविल्या जातात. महापालिका हद्दीलगतच्या २० किलोमीटरपर्यंतच्या ग्रामीण भागातही सिटीलिंकची बससेवा पोचली. सिटीलिंकच्या माध्यमातून व्यावसायिक, नोकरदार, विद्यार्थी, दिव्यांगांना प्रवासात विशेष सवलत दिली जाते.

बससेवा सुरळीत चालविताना रस्ता सुरक्षेचे सर्वनियम पाळले जातात. अल्पावधीतच सिटीलिंक कंपनीवर नाशिककरांचा विश्‍वास बसला. (latest marathi news)

रोड सेफ्टी पुरस्कार हा त्याचाच एक भाग आहे. २९ ऑक्टोबर २०२१ ला नाशिक महापालिकेला सुषमा स्वराज भवन, दिल्ली या ठिकाणी शहरी परिवहन संस्था, गृहनिर्माण वा शहरी व्यवहार मंत्रालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या १४ व्या अर्बन मोबिलिटी अवॉर्ड कार्यक्रमात ‘एक्सलन्स इन अर्बन ट्रान्स्पोर्ट २०२१’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

सिटीलिंकला मिळालेला हा ‘रोड सेफ्टी’ पुरस्कार म्हणजे नाशिकच्या दृष्टीने एक गौरवास्पद व अभिमानास्पद गोष्ट आहे. हा केवळ पुरस्कार नसून, लाखो नाशिककरांचा सिटीलिंकप्रती असलेला विश्वास आहे. आणि हाच विश्वास कायम टिकविण्यासाठी सिटीलिंक कायम प्रयत्नशील राहू असे सिटीलिंक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoffs Scenario: कोलकाताचे आव्हान संपुष्टात? गुजरात टायटन्सकडून दारूण पराभव, Point Table मध्ये मोठा बदल

GT vs KKR Live: शुभमन गिलची वादळी खेळी! विराट कोहलीकडून हिसकावली ऑरेंज कॅप; वैभव सूर्यवंशी टॉप फाईव्हमधून बाहेर गेला

AOR कोण आहेत, ज्यांना AI च्या वापराबाबत सरन्यायाधीशांकडून मिळाला इशारा; म्हणाले, विश्वास महत्त्वाचा!

Pune Police Bharti News: पोलिस भरती वैद्यकीय तपासणीत डमी उमेदवाराचा पर्दाफाश; ससून रुग्णालयातील प्रकारावर तिघींवर गुन्हा

Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक पडलं, पण संपलं नाही! आता मंजुरीसाठी सरकार कोणती रणनीती आखणार? ‘हे' ५ पर्याय गेमचेंजर ठरणार

SCROLL FOR NEXT