fund
fund esakal
नाशिक

Simhastha Kumbh Mela : कुंभमेळ्यासाठी फक्त 10 कोटीचे टोकन; मनपा निधीसाठी शासनावर अवलंबून

सकाळ वृत्तसेवा

Simhastha Kumbh Mela : २०२७ मध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा ( Simhastha Kumbh Mela ) होणार असल्याने आतापासूनच विकासकामे होणे अपेक्षित आहे. त्यासाठी आगामी आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकामध्ये आर्थिक तरतूद होणे अपेक्षित असताना महापालिकेने फक्त दहा कोटी रुपये टोकन रक्कम धरल्याने महापालिका प्रशासन निधीच्या बाबतीत पूर्णपणे शासनावर अवलंबून असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Simhastha Kumbh Mela)

२०२७ मध्ये नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. नाशिकमध्ये कुंभमेळा पार पाडण्याची जबाबदारी महापालिकेवर आहे. कुंभमेळ्यासाठी साधू- महंत तसेच देश- विदेशातून भाविक नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर दाखल होतात. आगामी संस्था कुंभमेळ्यामध्ये ही संख्या जवळपास दहा टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज आहे.

त्यामुळे साधू- महंतांना साधूग्राम व अन्य सुविधा पुरविण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. त्याचप्रमाणे भाविकांनादेखील सोयी सुविधा महापालिकेला पुरवाव्या लागणार आहेत. गोदाकाठी सिंहस्थ कुंभमेळा होत असल्याने गोदावरी प्रदूषण मुक्तीचेदेखील काम महापालिकेला करावे लागणार आहे. मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा करण्यासाठी ती कामे आत्तापासूनच करावी लागणार आहे.

अन्यथा कामाच्या गुणवत्तेचा प्रश्न उभा राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाच्या महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये आर्थिक तरतूद करून कामाला सुरवात करणे अपेक्षित आहे. परंतु, महापालिकेकडून मंजुरी देण्यात आलेल्या अंदाजपत्रकात सिंहस्थासाठी ठोस अशी रक्कम तरतूद केलेली नाही.

टोकन म्हणून दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी सारवासारव केली. साधूग्राम भूसंपादन त्याचप्रमाणे अंदाजपत्रकामध्ये विकास आराखड्याचादेखील उल्लेख नसल्याने महापालिका शासनाच्या भरवशावर कुंभमेळा पार पाडणार असल्याचे दिसून येत आहे.

शिखर समितीच्या बैठकीनंतर तरतूद

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विकास आराखडा तयार करण्याबरोबरच त्याला मंजुरी देणे व अन्य कुंभमेळा संदर्भातील कामे पार पाडण्यासाठी शासनाने शासन स्तरावर शिखर समिती तर स्थानिक पातळीवर जिल्हा समिती गठित केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील आठवड्यात नाशिक दौऱ्यात शेखर समितीने विकास आराखड्याला तातडीने मंजुरी देऊन शासनाला सादर करण्याच्या सूचना दिल्या. त्याअनुषंगाने नाशिक महापालिकेने अंदाजपत्रकात कुठलीच तरतूद केली नसल्याचे बोलले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi High Temperature : आजवरचे सगळे रेकॉर्ड मोडले; दिल्लीत उन्हाचा पारा 52 डिग्रीच्याही वर

Pune Car Crash Case: कल्याणीनगर प्रकरणातील आरोपीला निबंध लिहण्याची शिक्षा देऊन जामीन देणारा कोण? सदस्यांची होणार चौकशी

T20 World Cup: भारत-ऑस्ट्रेलिया संघात होणार फायनल? गावसकर, लारा, हेडनसह दिग्गजांनी काय केली भविष्यवाणी, पाहा Video

Manoj Jarange Patil Biopic : 'आम्ही जरांगे' सिनेमाचा टीझर रिलीज ; 'हा' मराठी अभिनेता साकारतोय मनोज जरांगेंची भूमिका

Thane News: बाबासाहेबांचा अवमान करणार्‍या आव्हाडवर फौजदार गुन्हा दाखल करा, आनंद परांजपे आक्रमक

SCROLL FOR NEXT