Simhastha Kumbh Mela: नाशिक रोड रेल्स्थानकावर क्राउड मॅनेजमेंट सिस्टीम; गर्दीवर नियंत्रणासाठी संशोधन

Nashik Road Railway Station
Nashik Road Railway Station

Simhastha Kumbh Mela : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक महापालिका तयारी करीत असतानाच रेल्वे मंत्रालयानेही गर्दी नियोजनासाठी पायाभूत सुविधा उभारण्याची पूर्वतयारी सुरू केली आहे. (Crowd Management System at Nashik Road Railway Station for Simhastha Kumbh Mela news)

नाशिक रोड रेल्स्थानकालगत जवळपास दीड लाख भाविकांचे क्रॉउड मॅनेजमेंट करण्यासाठी सिन्नर फाटा स्टेशनवाडी नाशिक रोडच्या पूर्व भागाकडे दुसरे प्रवेशद्वार विकसित केले जाणार आहे. त्यामुळे क्राउड मॅनेजमेंट सिस्टीम ही संशोधन आणि विकास तत्त्वावर उभारली जाणार आहे.

सिंहस्थ पर्वणीसाठी भाविक दर १२ वर्षांनी नाशिकला येतात. कुंभमेळ्यासाठी नियोजन सुरू झाले आहे. सिंहस्थासाठी प्रस्तावित केलेली कामे पूर्ण होण्यास दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागणार हे गृहित धरून नियोजन सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयानेही राज्य सरकारकडे सिंहस्थ कक्ष स्थापन करण्यास पत्रव्यवहार केला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देशभरातून साधू-संत भाविक येत असतात.

खासकरून यातील बहुतांश भाविक रेल्वे प्रवासाला पसंती देतात. पर्वणीसाठी येणाऱ्या भाविकांसाठी विशेष रेल्वेही सोडल्या जातात. त्यामुळे शाही पर्वणीला येणाऱ्या एकूण भाविकांपैकी ५० टक्के गर्दी ही रेल्वेवर अवलंबून असते.

Nashik Road Railway Station
Nashik Unseasonal Rain Damage : अवकाळीचा द्राक्ष निर्यातीलाही तडाखा; धुक्यामुळे द्राक्षमण्यांवर रोगाची शक्यता

रेल्वेतून उतरल्यानंतर हे भाविक थेट गंगाघाटावर न जाता ते काही काळ रेल्वे स्थानकावर थांबतील, असे नियोजन रेल्वे करणार आहे.

या व्यवस्थेला त्यांनी क्राउड मॅनेजमेंट सिस्टीम असे नाव दिले आहे. भाविकांच्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी नाशिक रोड रेल्वेस्थानकाचे पूर्वेकडील प्रवेशद्वार विकसित केले जाणार आहे. यासंदर्भात केंद्र शासनाचे रेल्वे लॅन्ड डेव्हलपमेंट ऑथोरिटी प्रस्ताव तयार करीत आहे.

अशी असेल रचना

नाशिक रोड रेल्वेस्थानकाच्या पूर्व प्रवेशद्वाराजवळ वातानुकूलित दुकाने, रेस्ट रूम, सरकते जिने, लिफ्ट, आधुनिक तिकिटघरापासून तर हॉटेलचीही रेलचेल असणार आहे. मोकळी जागा विकसित करणे, संलग्न रस्त्यांची डागडुजी करणे, भाविकांना गोदावरी किनारा ते पुन्हा रेल्वे स्टेशनला परतता येईल या पद्धतीने वाहतूक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

Nashik Road Railway Station
Nashik News: सरकारी काम अन सहा महिने थांब..! रिक्त जागांमुळे सरकारी कामकाज अधू, कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com