sakal (66).jpg 
नाशिक

चिंता वाढली! कोरोना प्रादुर्भाव वाढणाऱ्या देशातील 10 शहरात 'नाशिक'चा समावेश; महापालिका आय़ुक्तांची माहिती

विक्रांत मते

नाशिक : कोरोना पार्श्वभूमीवर प्रादुर्भाव वाढणाऱ्या देशातील 10 शहरात नाशिक कॉमन असल्याची माहिती महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली. नाशिककर गंभीर नाही हे दुर्दैव असून बंधनं न पाळणाऱ्या नागरिकांवर आता कडक कारवाई होणार आहे. होम आयसोलेशन न पाळणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार असून अनेक आरोग्य पथकांची विशेष निर्मिती करण्यात येणार तसेच खबरदारी म्हणून शहरात कमांड कंट्रोल रूम सुरू करण्यात येणार असल्याचा महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले. बंधन न पाळणाऱ्या नागरिकांसोबत,शिस्त न पाळता चालढकल करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.

31 मार्चपर्यंत महापालिका हद्दीतील सर्व शाळा बंद

कोरोना पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील सर्व शाळा 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 10वी,12वी मात्र पालकांच्या संमतीने ऐच्छिक सुरू राहणार असल्याचे नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले. 

कोरोना स्प्रेडरवर होणार कारवाई

होम आयसोलेशन मधील बाहेर फिरणारे सुपर स्प्रेडर असून त्यांच्यामुळे रुग्ण वाढण्याची भिती आहे. तसेच त्यांना शोधुन जबरदस्ती पालिका रुग्णालयात दाखल करणार असल्याचे आयुक्त म्हणाले. आणि त्यांच्यावर गुन्हाही दाखल करणार असल्याचे म्हणाले.

रिपोर्ट्सची तपासणी

15 दिवसात,पालिकेची बिटको रुग्णालयात, सॅम्पल टेस्टिंग लॅब तसेच दररोज 2 हजार सॅम्पल तपासणी होणार असल्याचे सांगितले. नोडल अधिकाऱ्यांकडून खाजगी लॅब्जकडून दिल्या जाणाऱ्या रिपोर्ट्सची तपासणी करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुण्यात खळबळ ! ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेत शिवीगाळ केल्याचा आरोप

Talathi Office Bribery : वडिलांचे नाव लावायला उपसरपंच, तलाठ्याने गाठली खालची पातळी, ‘लाचलुचपत’ पथक आलं शेतकऱ्याच्या मदतीला

Latest Marathi News Live Update : ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेत फिर्यादीला शिवीगाळ केल्याचा आरोप

Gold Rate Today: सलग पाचव्या दिवशी सोनं झालं स्वस्त! सर्वसामान्यांना मोठा दिलासा; 1 तोळा सोनं आता कितीला? पाहा आजचा ताजा भाव

Sangli Property Card : सदनिकाधारकांना स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड; राज्य सरकारकडून हालचाली, कायद्याच्या अभ्यासासाठी समिती नियुक्त

SCROLL FOR NEXT