esakal | झटपट श्रीमंतीच्या मोहात तरुणाई गुन्हेगारीकडे! द्राक्षनगरीत फोफावतेय भाईगीरीचे वेड
sakal

बोलून बातमी शोधा

Young people are turning to crime because of the lure of instant riches Nashik Crime News

द्राक्षनगरीत काही दिवसात घडलेल्या घटनांवरून तरुणांना भाईगिरीचे वेड लागले की काय, असा प्रश्‍न निर्माण होतो आहे. झटपट श्रीमंत व अल्पावधीत प्रसिद्ध होण्याच्या नादात तरुणाई गुन्हेगारीकडे वळल्याचे चित्र आहे

झटपट श्रीमंतीच्या मोहात तरुणाई गुन्हेगारीकडे! द्राक्षनगरीत फोफावतेय भाईगीरीचे वेड

sakal_logo
By
दीपक अहिरे

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) :  द्राक्षनगरीत काही दिवसात घडलेल्या घटनांवरून तरुणांना भाईगिरीचे वेड लागले की काय, असा प्रश्‍न निर्माण होतो आहे. झटपट श्रीमंत व अल्पावधीत प्रसिद्ध होण्याच्या नादात तरुणाई गुन्हेगारीकडे वळल्याचे चित्र आहे. त्यातून व्यसनाच्या आहारी जात आहेत. शिंदे पिता-पुत्राची हत्येचे प्रकरण ताजे असताना धारधार शस्त्र बाळगणारा गुन्ह्याच्या हेतूने बाहेरगाववरून आलेला तरुण आढळला. खलप्रवृत्तीकडे झुकू पाहणाऱ्या तरुणांना वेळीच रोखण्याचे आव्हान कुटुंबे व पोलिस प्रशासनापुढे उभे ठाकले आहे. 

नऊ वर्षांपूर्वी झालेले कांदा व्यापारी शंकरलाल ठक्कर यांचे प्रकरण राज्यभरात गाजले. पाच कोटींच्या खंडणीसाठी स्थानिक टोळीचे मोरके सचिन कोल्हे व बैरागी यांच्या टोळीने रचलेला डाव पोलिसांच्या कारवाईने उधळून लावला होता. ठक्कर यांचे अपहरणापूर्वी कोल्हे टोळीने शहरात गुन्हे करताना लाखो रुपये उकळल्याची चर्चा आहे. अगोदरचा डाव यशस्वी झाल्याने कोल्हे टोळीने ते धाडसी पाऊल उचलले होते. अंबिकानगर येथे सहा महिन्यांपूर्वी विकी धाडिवाल याने भावाच्या साथीने शिंदे पिता-पुत्राचा खून केला. दोन वर्षांपूर्वी भाऊनगरलगत पारधेवाड्यात तरुणावर टोळीने चाकूने वार केले. वर्षाभरापूर्वी गुन्हेगारी वृत्तीच्या गौरव आकडे याने व्यापारी जुगलकिशोर राठी यांच्यावर हल्ला केला. काही दिवसांपूर्वी राजरोज चॉपर घेऊन वावरणारा सागर कुचेकर गुंड प्रवृत्तीचा तरुण आढळला. 

हेही वाचा - सोने-चांदीच्या दरात घसरण सुरुच; गेल्या १० महिन्यांत निच्चांकी स्तर
 

पोलिसांना आव्हान 

हे सर्व घटनाक्रम पोलिस यंत्रणेला आव्हान देणारे आहे. या घटनांबरोबरच पोलिस दफ्तरी नोंद नसलेले टोळीयुद्ध काही भागात सुरू असते. गुन्हेगारी जगतात दबदबा निर्माण करण्याचा हेतू आहे. गुंडगिरीत नाव कमावल्यास खंडणी, वसुली, हप्ता, प्रोटेक्शन मनी आणि चंदा या माध्यमातून बक्कळ पैसा कमावता येतो, अशी धारणा असल्याने १६ ते २१ वर्ष वयोगटातील मुले गुन्हागारी जगाकडे वळत आहेत. झोपडपट्टी वस्ती, व्यवनाधीन आई-वडील, किंवा विभक्त कुटुंबात जगणारी मुले लवकर वाईट संगतीत येऊन व्यसनाधीन होतात. लूटमार, वाटमाऱ्या, चोरी, चेनस्नॅचिंग, घरफोडी असे मार्ग पत्करतात. त्यातून त्यांचे मन गुन्हेगारीत टॉपवर असलेल्या भाई किवा दादाकडे वळते. 

हेही वाचा - काळजावर ठेवला दगड आणि शेतकऱ्याने उभ्या पिकात सोडली मेंढरे! स्वप्न चक्काचूर

पिंपळगाव शहरात गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिस डोळ्यात तेल घालून काम करीत आहेत. संबंधित ठिकाणी छापा टाकला जात आहे. मध्यरात्री शहरातील पोलिस गस्त वाढविली आहे. गुन्हेगाराच्या मुसक्या आवळून शहराची कायदा व सुव्यव्यस्था अबाधित राखण्याचा प्रयत्न आहे. 
- भाऊसाहेब पटारे, पोलिस निरीक्षक, पिंपळगाव बसवंत  

 
 

go to top