Jagadguru Shree Tukobarai Tricentenary Amrit Mahotsav Vaikunthagaman Festival Crowded at Agricultural Exhibition
Jagadguru Shree Tukobarai Tricentenary Amrit Mahotsav Vaikunthagaman Festival Crowded at Agricultural Exhibition esakal
नाशिक

Nashik News: श्री तुकोबाराय वैकुंठगमन सोहळ्यात गर्दीचा उच्चांक! अखेरच्या दिवशी पाऊण लाख भाविकांच्या उपस्थितीचा अंदाज

सकाळ वृत्तसेवा

चंद्रकांत जगदाळे : सकाळ वृत्तसेवा

गोंदेगाव : शंभर एकर जागा... चाळीस हजार आसन क्षमता असलेला मंडप... २४ तास चालू असलेला तुकाराम नामाचा गजर... संगीत पारायणासाठी बसलेले साडेतीन हजारांपेक्षा जास्त भाविक... भव्य कृषी प्रदर्शन असा कार्यक्रम असलेल्या जगद्गुरु श्री तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी ३७५ वा वैकुंठगमन सोहळ्याची उत्साहाने सुरुवात झाली.

पहिल्याच दिवशी २५ हजार, तर दुसऱ्या दिवशी तीस हजारांपेक्षा जास्त भाविकांनी उपस्थिती लावली. अखेरच्या दिवशी गर्दीचा आकडा पाऊण लाखांच्या पार जाणार असल्याचे आयोजकांचे मत आहे. प्रशस्त जागा, कार्यकर्त्यांची मुबलकता, भाविकांच्या सोयी-सुविधांची उभारणी, अचूक नियोजनामुळे या सोहळ्याने जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे. (Nashik peak of crowd in Sri Tukaram Vaikuntha Gaman ceremony news)

श्री तुकोबाराय वैकुंठगमन सोहळ्यात भक्तांची गर्दी

राज्यातील विविध भागांतून भाविक या सोहळ्याच्या ठिकाणी मुक्कामी आले आहेत. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पन्नासपेक्षा जास्त पोलिसांचा पहारा कार्यक्रमस्थळी आहे. सोहळ्यात भव्य कृषी प्रदर्शन, आरोग्य, सर्व रोगनिदान व उपचार शिबिरासह रक्तदान शिबिराचे उदघाटन संत शिरोमणी तुकोबारायांचे वंशज व देहू संस्थानचे अध्यक्ष हभप पुरुषोत्तम महाराज मोरे, विश्‍वस्त हभप माणिक महाराज मोरे, हभप ज्ञानेश्‍वर माऊली कदम (छोटे माऊली) व उपस्थित संत महात्म्यांच्या हस्ते करण्यात आले.

कृषी प्रदर्शनात सहभाग घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कृषी, यंत्रसामुग्री, बचत गट उत्पादने, खाद्यपदार्थ, आरोग्य औषधी, रोपवाटीका आदी क्षेत्रात काम करणाऱ्या उत्पादकांनी सहभाग नोंदविला आहे. आरोग्य शिबिरात नाशिक जिल्ह्यातील नामांकित हॉस्पिटल सेवा देत आहेत.

समता ब्लड बँक नाशिक यांच्या वतीने रक्तदान शिबिर, तर लासलगाव येथील कृष्णाई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून मोफत नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तुकोबारायांच्या देहू येथून आलेल्या पादुकांच्या दर्शनासाठी मोठा शामियाना उभारण्यात येऊन त्या ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. परिसरात नेमून दिलेले टाळकरी व विणेकरी तुकाराम नामाचा जप रात्रंदिवस करत आहेत.

मागील वर्षभरापासून संगीत गाथा पारायण सोहळ्याची जय्यत तयारी चालू होती. झुडपांनी वेढलेला हा परिसर जेसीबीच्या सहाय्याने स्वच्छ आणि सपाट करण्यात आला. परिसराच्या आजूबाजूने पाईपलाईन गेलेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या विहिरीचे पाणी कार्यक्रमास देऊन पाण्याची समस्या सोडविली. (latest marathi news)

पिण्याच्या पाण्याची चोख व्यवस्था

भरवस - वाहेगाव व भरवस - मरळगोई रस्त्यावर विद्युत रोषणाई करण्याचे कार्य दीड महिना अगोदर व मुख्य मंडप उभारणीचे काम महिनाभर अगोदर सुरुवात करण्यात आली. प्रशस्त जागेवर भव्य मंडपाची उभारणी झाली असल्यामुळे हजारोंच्या उपस्थितीत सुद्धा उन्हाची तीव्रता जाणवली नाही. पिण्याच्या पाण्याचे हजारो जार उपलब्ध होत आहेत. महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची उभारणी केली आहे. २४ तास वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती, अग्निशमन दलाचा बंबदेखील दिमतीला आहे.

ट्रॅक्टरभरून चपाती, आमटी

पहाटेच्या काकड आरतीपासून दिवसाचा प्रारंभ होणाऱ्या कार्यक्रमास हजारो भाविकांची उपस्थिती असते. सकाळच्या सत्रात आमटी, रव्याचा शिरा आणि भात अशी मेजवानी, तर रात्री आजूबाजूच्या गावांतून किमान पंधरा हजार भाकरी रोज उपलब्ध होत आहेत. या भाकरी गोळा करण्यासाठी प्रत्येक गावात ट्रॅक्टरची व्यवस्था केली आहे. तर दररोज दोन टँकर भरेल इतकी आमटी कार्यक्रमस्थळी बनविली जाते. पंक्तीमध्ये वाढण्यासाठी ३० छोटे ट्रॅक्टर, सातशे स्वयंसेवक असतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Paresh Rawal: "मतदान न करणाऱ्यांचे टॅक्स वाढवा.."; परेश रावल यांनी केली शिक्षेची मागणी

RCB vs CSK: चेन्नईला पराभूत झालेलं पाहताच दिग्गज क्रिकेटरचे पाणावले डोळे, Video होतोय व्हायरल

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Apple News : ॲपल कंपनीने नाकारले १७ लाख ऍप ; जाणून घ्या काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT