Sohan Macchre esakal
नाशिक

Nashik Police Transfer: सोहन माछरे सातपूरचे ‘प्रभारी’! आयुक्तांची नाराजी भोवली; नलावडेंना झटका

Police Transfer : पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी म्हणून काही आठवड्यांपूर्वीच नियुक्त झालेले रणजित नलावडे यांना दुय्यम पदावर काम करण्याची वेळ आयुक्तांच्या नाराजीमुळे ओढावली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Police Transfer : सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एकाच रात्री १० ते १२ वाहनांची तोडफोडीच्या घटनेनंतर १२ तास उलटूनही याप्रकरणी गुन्हा दाखल झाला नाही. याचा जाब विचार पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांनाच सातपूर पोलिस ठाण्याच्या प्रभारीपदी नियुक्ती केली आहे.

याच पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी म्हणून काही आठवड्यांपूर्वीच नियुक्त झालेले रणजित नलावडे यांना दुय्यम पदावर काम करण्याची वेळ आयुक्तांच्या नाराजीमुळे ओढावली आहे. (Nashik Police Transfer marathi news)

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या जानेवारीच्या अखेरीस शहरातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. बहुतांशी पोलिस ठाण्यांची जबाबदारी नवीन अधिकाऱ्यांना सोपविली गेली होती. त्यात सातपूर पोलिस ठाण्याची जबाबदारी गुन्हेशाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांना देण्यात आली होती.

दरम्यान, रविवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास श्रमिकनगरमधील सात माऊली परिसरामध्ये अज्ञात टोळक्याने धुडघूस घालत १० ते १२ चारचाकी वाहनांच्या काचा फोडत दहशत माजविली. यासंदर्भात सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नलावडे यांच्याकडून कोणतेही तात्काळ पावले उचलली गेली नाहीत. (Latest Marathi News)

परिणामी याचा जाब पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी जाब विचारला असता, त्याचे समाधानकारक उत्तरही मिळाले नाही. त्यामुळे नाराज झालेल्या आयुक्तांनी शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनचे पोलीस निरीक्षक सोहम माछरे यांची सातपूर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकारीपदी नियुक्ती करीत तत्काल पदभार स्वीकारण्याचे आदेशही दिले.

त्यानुसार माछरे यांनी रविवारीच पदभार स्वीकारला आहे. माछरे यांची काही दिवसांपूर्वी युनिट दोनच्या वरिष्ठ अधिकारीपदी नियुक्ती केली होती. तत्पूर्वी त्यांच्याकडे पंचवटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही जबाबदारी देण्यात आली होती. परंतु ठाण्यावरून नुकतेच बदलून आलेले मधुकर कड यांची पंचवटीत नियुक्ती केल्याने माछरे यांना युनिट दोनची जबाबदारी देण्यात आली होती. तर, नलावडे यांची नियुक्ती सातपूर पोलीस ठाण्यातच दुय्यम अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT