Nashik Police: आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस ‘सतर्क’! टवाळखोरांसह रेकॉर्डवरील संशयितांवर होणार कारवाई

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून येत्या काही दिवसात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे
Nashik Police Commissionerate on Alert
Nashik Police Commissionerate on Alertesakal

नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून येत्या काही दिवसात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळात गुन्हेगारी वाढून अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहर पोलीस सतर्क झाले आहेत.

शहरात टवाळखोरांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई पोलिसांनी सुरू केली आहे. तसेच, अवैध व्यवसाय करणाऱ्या संशयितांचीही धरपकड केली जात असून रेकॉर्डवरील संशयितांवर येत्या काही दिवसात गंभीर स्वरुपाच्या कारवाई केल्या जाण्याची शक्यता आहे. (Police vigilant in wake of upcoming elections Action will taken against suspects on record including fugitives Nashik)

सध्या देशात आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. येत्या काही दिवसांमध्ये निवडणूक आयोगाकडून घोषणा होण्याचीही शक्यता आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस आयुक्तालय सतर्क झाले आहे.

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह प्रभारी पोलीस निरीक्षकांच्या बैठका घेत सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच, आयुक्तालयामध्ये विशेष निवडणूक कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.

या कक्षामार्फत आयुक्तालय हददीतील पोलीस ठाणेनिहाय टवाळखोरांसह रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती संकलित केली जात आहे. तसेच, गेल्या काही वर्षांतील निवडणुकींमध्ये दाखल गुन्ह्यांतील संशयितांचीही माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे.

पोलिसांकडून सुरू असलेल्या संकलित माहितीनुसार, लवकरच रेकॉर्डवरील संशयितांसह टवाळखोरांविरोधात पोलीस आयुक्तांकडून गंभीर स्वरुपाची कारवाई केली जाण्याचे संकेत आहेत.

याच पार्श्वभूमीवर पोलीसांकडून सध्या आयुक्तालय हद्दीतील अवैधरित्या सुरू असलेल्या धंद्यावर कारवाई केली जात आहे. अवैध जुगार, दारुअड्डे, अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करीत गुन्हे दाखल केले जात आहेत.

यातील गंभीर गुन्हे असलेल्या संशयितांचे तडीपारी आणि स्थानबद्धतेचेही प्रस्ताव पोलीस ठाणेनिहाय तयार करण्याचे आदेश आयुक्तांनी दिलेले आहेत. त्यानुसार प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांकडून सराईत गुंडांचे प्रस्ताव आयुक्तांकडे पाठविण्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

Nashik Police Commissionerate on Alert
Nashik Police Helpline : व्हॉट्सॲप हेल्पलाईनच्या तक्रारींना आयुक्तालयाचा क्विक रिस्पॉन्स!

उपायुक्तांच्या सूचना

शहर गुन्हेशाखेकडून परिमंडळ एक व दोनकडून त्यांच्या हद्दीतील सराईद गुन्हेगार व प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेल्याची माहिती मागविण्यात आली आहे.

त्यानुसार परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, परिमंडळ दोनचे उपायुक्त मोनिका राऊत यांच्याकडून संबंधित पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना संशयितांची धरपकड करण्याचे आदेश दिले आहेत.

त्याचप्रमाणे, रस्त्यावर धिंगाणा घालणाऱ्या, उपद्रवी, सुसाट वाहने चालविणाऱ्यांसह वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्यांवर वाहतूक पोलीस शाखांनी कारवाई करण्याच्या सूचना शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी केल्या आहेत.

गुन्हेशाखेकडून वॉच

रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह गेल्या काही निवडणुकांमध्ये गुन्हे दाखल असणाऱ्या संशयितांची माहिती शहर गुन्हेशाखेने संकलित केली आहे.

तसेच, पसार असलेल्या संशयितांचा शहर गुन्हेशाखांची युनिट एक, दोन आणि विशेष शाखांकडून शोध घेतला जात आहे. त्याचप्रमाणे, रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर पथकांकडून बारकाईने नजर ठेवली जात आहे.

Nashik Police Commissionerate on Alert
Nashik Police : ‘पीपल ओरिएंटेड’ पोलिसिंगवर भर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com