Nashik Police : पोलिसांना चांगल्या कामाची पावती मिळावी : संदीप कर्णिक

Nashik Police : पोलिस कर्मचाऱ्यांना कामाची पावती मिळाली पाहिजे, अशा पोलिस कर्मचाऱ्यांना प्रकाशझोतात आणावे.
Commissioner of Police Sandeep Karnik, Deputy Commissioner Kiran Kumar Chavan, Assistant Commissioner Siddheshwar Dhumal etc. while returning the missing mobile phone
Commissioner of Police Sandeep Karnik, Deputy Commissioner Kiran Kumar Chavan, Assistant Commissioner Siddheshwar Dhumal etc. while returning the missing mobile phoneesakal

Nashik Police : पोलिस कर्मचाऱ्यांना कामाची पावती मिळाली पाहिजे, अशा पोलिस कर्मचाऱ्यांना प्रकाशझोतात आणावे. कर्मचाऱ्यांच्या चांगल्या कामाने अधिकाऱ्यांचेही नाव मोठे होते. पोलिस कर्मचाऱ्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाचे श्रेय त्यांना दिले पाहिजे, असे प्रतिपादन पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले. (Nashik Police)

पंचवटी पोलिस ठाण्यात गुरुवारी झालेल्या सोन्या- चांदीचे दागिने, दुचाकी, मोबाईल चोरीचे तंत्रज्ञान वापरून त्यांचा शोध घेऊन मूळ मालकांना मुद्देमाल हस्तांतर करण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. पोलिस आयुक्तांच्या उपस्थितीत शोध घेणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या हस्ते मूळ मालकांना मुद्देमाल परत करण्यात आला.

Commissioner of Police Sandeep Karnik, Deputy Commissioner Kiran Kumar Chavan, Assistant Commissioner Siddheshwar Dhumal etc. while returning the missing mobile phone
Nashik Police Transfer : पंचवटी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी मधुकर कड; सोहन माछरे यांची बदली

कार्यक्रमास पोलिस उपायुक्त विजयकुमार चव्हाण, सहायक पोलिस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ, पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधूकर कड, पोलिस कर्मचारी श्रीकांत साळवी, नेहा सूर्यवंशी उपस्थित होते. वरिष्ठ निरीक्षक कड यांनी प्रास्ताविकातून तांत्रिक कौशल्याचा वापर करून त्याचा शोध घेऊन ते मूळ मालकांना परत करण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये विश्वास निर्माण होत असल्याचे सांगितले.

पोलिस उपनिरीक्षक वर्षा पाटील यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. गोरख भोईर व विलास वैद्य या मुद्देमाल परत मिळालेल्या व्यक्तींनी मनोगत व्यक्त केले. पंचवटी पोलिस ठाण्यातील कर्मचारी श्रीकांत साळवी व नेहा सूर्यवंशी यांनी नागरिकांचे गहाळ झालेले मोबाईल तांत्रिक विश्लेषण करून शोध लावल्याबद्दल त्यांचा पोलिस आयुक्तांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Commissioner of Police Sandeep Karnik, Deputy Commissioner Kiran Kumar Chavan, Assistant Commissioner Siddheshwar Dhumal etc. while returning the missing mobile phone
Nashik Police : ‘पीपल ओरिएंटेड’ पोलिसिंगवर भर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com