Nashik: Different types of umbrellas sold in the market for monsoon esakal
नाशिक

Nashik Rain Update : व्यावसायिकांना पावसाची प्रतीक्षा; पावसाळी वस्तूंची बाजारपेठ मंदावली

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : निम्मा जून महिना उलटला पाऊस मात्र पडला नाही. पावसाळी वस्तूंची बाजारपेठ पूर्णत: मंदावली आहे. पावसाच्या प्रतीक्षेत व्यावसायिक चांगलेच हवालदिल झाले आहे. त्यांच्या नजरा आकाशाकडे लागून आहे.

दरवर्षी ७ जून पासून सरासरी पावसास सुरवात होत असते. त्यानिमित्त मे महिन्याच्या मध्यापासून पावसाळी वस्तू विक्रीच्या बाजारपेठ सजण्यास सुरवात झालेली असते. जून महिन्यात तर वस्तू खरेदीसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर बाजारपेठेत नागरिकांकडून गर्दी केली जाते. (Nashik Rain Update Businessman wait for raiMonsoon material market slows down Nashik News)

यंदाच्या कडाक्याच्या उन्हामुळे पावसाळाही जोरदार होण्याची शक्यता वर्तवली जात होती. प्रत्यक्षात मात्र उलट झाले. निम्मा जून महिना उलटला तरी देखील पाऊस पडला नाही. नागरिकांनी पावसाळी वस्तू खरेदीकडे पाठ केली.

बाजारपेठेवर मंदीचे सावट दिसून येत आहे. जोरदार पावसाच्या शक्यतेने प्लॅस्टिक कापड विक्रेते, छत्री, रेनकोट, प्लॅस्टिक पादत्राणे यासह अन्य पावसाळी वस्तू विक्रेते व्यावसायिकांनी दुकानात लाखो रुपयांचा साठा करून ठेवला आहे.

अशाच पद्धतीने यापुढेही पाऊस पडला नाही तर साठा केलेला माल तसाच पडून राहणार आहे. त्यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागण्याची शक्यता व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

व्यावसायिकांच्या पावसाकडे नजरा
दुसरीकडे पाऊस नसल्याने शेतीचे कामे देखील रखडली आहे. पेरणी, नांगरणी होत नसल्याने बी बियाणे, शेती कामासाठी लागणारे अवजारे, खत, विजेची मोटर यांची देखील मागणी खुंटली आहे.

शेती अवजारे विक्रेत्यांवर अधिकच परिणाम झाले आहे. एक एक दोन दोन दिवस ग्राहक येत नाही. आले तरी एखादी ग्राहक येत असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. या सर्व वस्तू एकमेकांवर अवलंबून असल्याने मागणी अभावी एकूणच बाजारपेठेवर मंदीचे सावट आहे. केवळ पावसाची प्रतीक्षा केली जात असल्याचे व्यवसायिकांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

"लहान मोठ्या छत्र्या तसेच अन्य पावसाळी वस्तूंचा साठा करून ठेवला आहे. पाऊस मात्र लांबल्याने केवळ दहा टक्के विक्री झाली आहे. कधी पाऊस पडतो आणि व्यवसायात तेजी येते. याकडे नजरा लागून आहे."
चंद्रकांत बोरसे, छत्री व्यावसायिक

"जून महिन्यात पावसाळा सुरू होताच पेरण्यांना सुरवात होत असते. शेती कामासाठी विविध अवजारांची आवश्यकता भासत असते. मे महिन्यापासूनच शेतकरी बांधव अवजारे घेण्यासाठी दुकानावर गर्दी करत असतात. यंदा मात्र शेतकऱ्यांनी पाऊस नसल्याने अवजारे खरेदीकडे पाठ केली आहे."
अरमान कुरेशी, शेती अवजारे विक्रेता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Car Accident : ओव्हरटेकच्या नादात नादुरुस्त ट्रकवर कार धडकली; दोघे ठार, चौघे गंभीर जखमी

Pune rain forecast: पुण्यात हलक्या सरींचे पुनरागमन; उकाड्यात दिलासा, पुढील चार दिवस पावसाची शक्यता

Latest Marathi News Live Update : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा फलटण मध्ये दाखल

Water Crisis : नाशिक विभागात २८२ टँकरवर सहा लाख नागरिकांची भिस्त; अर्धा जुलै संपला, तरी तहान कायम

MLA Orders Probe: उमरगा उपजिल्हा रुग्णालयातील गैरव्यवस्थेवर आमदार प्रवीण स्वामींचा धडक आढावा, रुग्णसेवेत तातडीने सुधारणा करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT