Nashik Rain News : बागलाण मध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी; कुठे झाड कोसळलं तर कुठे रस्ता बंद

Rain Update News
Rain Update Newsesakal

Nashik News : बागलाण तालुक्याच्या पश्चिम भागात दुपारी जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.

त्यामुळे सटाणा डांगसौंदाणे रस्त्यावर कंधाणे गावाजवळ जुने आंब्याचे झाड कोसळल्याने रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाल्याने दुतर्फा वाहने अडकून पडली. (accompanied by gale in Baglan tree has fallen road closed Nashik News)

सकाळपासून वातावरणात बदल जाणवत होता कडक ऊन आणि उकाडा वाढला होता आभाळात ढगांनी गर्दी केली होती.

तीन वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला वाऱ्याचा व पावसाचा जोर वाढला विजांच्या गडगडाट व वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू झाला.

जवळपास एक तास झोडपल्यामुळे पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे सटाणा डांगसौंदाणे रस्त्यावर आंब्याचे झाड कोसळल्याने रस्ता बंद झाला. आज सटाणा येथील आठवडे बाजार असल्याने पश्चिम भागातून भाजीपाला आंबे करवंदे विक्री व बाजाराला जाणाऱ्या येणाऱ्यांची वर्दळ होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Rain Update News
Nashik Heavy Rain Damage: जोरदार वारा अन अवकाळी पावसाने पिळकोस येथे मोठ्या प्रमाणावर नुकसान

पण झाड कोसळले त्यावेळी रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे वाहन नसल्याने सुदैवाने जीवितहानी टळली तालुक्यातील पश्चिम भागात नेहमी पावसाचा जोर अधिक असतो त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून किंवा फांद्या तुटून पडतात.

व त्यामुळे रस्ता बंद पडण्याच्या घटना पावसाळ्यात घडत असतात सटाणा डांगसौंदाणे रस्त्यावर अनेक ठिकाणी अशी धोकादायक झाडे आहेत.

संबंधित विभागाने किमान रस्त्याच्या कडेला झुकलेल्या झाडांच्या मोठमोठ्या फांद्या छाटून धोकादायक व जीर्ण झाडे हटवावीत अशी मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे.

Rain Update News
Nashik Rain Damage : देवळा, मालेगावला पावसाची हजेरी; टोकडेत शाळेचे पत्रे उडाले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com