Municipal officials-employees removing encroachments on Sambhajinagar highway on Saturday.
Municipal officials-employees removing encroachments on Sambhajinagar highway on Saturday.  esakal
नाशिक

Nashik News : संभाजीनगर रोडवरील अतिक्रमणांचा बंदोबस्त! येवल्यात नगरपालिकेची कारवाई, भाजी विक्रेत्यांना तंबी

सकाळ वृत्तसेवा

येवला : शहरातील संभाजीनगर व कोपरगाव चौफुलीपासून ते उड्डाणपुलापर्यंत नगरपालिकेने शनिवारी (ता.२०) मोहीम राबवून विविध अतिक्रमणे हटविली. सातत्याने होणारी वाहतुकीची कोंडी थांबविण्यासाठी हे पावले उचलली आहेत. संभाजीनगर महामार्गावरच भरणारा भाजी बाजारही बसू नये, अशी तंबी विक्रेत्यांना देण्यात आली. (Nashik Settlement of encroachments on Sambhajinagar Road news)

मागील काही महिन्यांपासून शहरातून जाणाऱ्या नाशिक- संभाजीनगर व नगर- धुळे महामार्गावर वाहतूक कोंडीने पूर्णतः बोजवारा उडाला आहे. एवढेच कमी की काय पंधरा दिवसांपूर्वी विंचूर चौफुलीवर एका पंधरा वर्षीय बालिकेचा ट्रकखाली मृत्यू झाल्याने हा प्रश्न अधिकच गंभीर असल्याचे उघड झाले.

त्यामुळे येथे तासन्‌तास वाहतुकीचा खोळंबा होत असल्याने यावर उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी सर्वपक्षीय समितीच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली होती. या मागणीला अनुसरून उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलविण्यात आली होती. त्यानंतर प्रशासन ॲक्टिव्ह मोडवर आले असून नगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली.

प्रचंड वर्दळीच्या व शहराचे प्रवेशद्वार असलेल्या विंचूर चौफुली वरील सर्व अनधिकृत टपऱ्या व दुकाने हटविण्यात आल्या आहेत. रस्त्यावर भरणारा भाजी बाजारही बंद करण्यात आल्याने चौफुलीने मोकळा श्वास घेतला असून वाहतूक सुरळीत होण्यासाठी याचा फायदा झाला आहे.

यानंतर फत्तेबुरुज नाका व गंगा दरवाजा येथे असाच प्रकार असल्याने आता नगरपालिकेने या परिसरातील अनधिकृत अतिक्रमणाकडे लक्ष घातले आहे. तीन दिवस अगोदर नोटीस देऊनही अतिक्रमित जागेवर व्यवसाय सुरूच असल्याने आज येवला- छत्रपती संभाजीनगर मार्गावरील वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढण्यात आली. (latest marathi news)

या भागातील अतिक्रमित टपरी, दुकाने तसेच विविध फलक हटविण्यात आली. तसेच दररोज संध्याकाळी येवला-संभाजीनगर महामार्गावर भाजीबाजार भरत असतो. रस्त्याच्या कडेला भरणाऱ्या या बाजारामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. तसेच अपघात होण्याचीही शक्यता नाकारता येत नसल्याने सदरचे अतिक्रमण काढण्यात आले आहे.

मुख्याधिकारी किरण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाचे अमोल पाटील, स्वच्छता निरीक्षक सागर झावरे, गोविंद गवंडे, बांधकाम अभियंता सुतावणे, कर निरीक्षक भोये, आदित्य मुरकुटे, श्याम निकम, आकाश गायकवाड यांच्यासह नगरपालिका कर्मचारी उपस्थित होते.

विक्रेत्यांना लेखी सूचना

येवला-संभाजीनगर महामार्गावर बसणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांना लेखी सूचना देण्यात आली आहे. महामार्गावर भाजीविक्रीसाठी न बसता इतर ठिकाणी बसून व्यवसाय करावा असेही या नोटिशीत म्हटले आहे.महामार्गाच्या कडेला भाजीविक्री करताना आढळून आल्यास सामान जप्त करण्यासह कठोर कारवाई करण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले.

"अतिक्रमित जागेवर व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांचे अतिक्रमण काढण्यात आलेले आहे.दोन ते तीन दिवस अगोदर नोटीस देऊनही अतिक्रमण जैसे थे असल्याने ही कारवाई करण्यात आली."- किरण देशमुख, मुख्याधिकारी, नगरपालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election : प्रचाराचे वादळ थंडावले ; सातव्या टप्प्यासाठी उद्या मतदान

Kalyani Nagar Accident :भ्रष्ट चेल्यांनी बदलले तिघांचे रक्तनमुने ; ‘ससून’मधील डॉक्टरांची बनवाबनवी

Pune Accident : पुण्यात पुन्हा रॅश ड्रायव्हिंग ; बीआरटी मार्गात घुसवली मोटार

World No Tobacco Day 2024 : हृदय-फुफ्फुसांपासून ते कर्करोगापर्यंत, धूम्रपानामुळे ‘या’ गंभीर आजारांना मिळतेय आमंत्रण

World No Tobacco Day 2024: ‘तंबाखू’वर मात शक्य! हवा फक्त दृढनिश्चय; ‘आरोग्य’ विभागाकडून 2 वर्षात दीड लाखावर समुपदेशन

SCROLL FOR NEXT