Nashik News : आदिमायेच्या भक्तांना भगवतीच्या भेटीची ओढ! पाऊण लाखांहून अधिक भाविक आदिमायेच्या चरणी नतमस्तक

Nashik News : कडो मैलाचा प्रवास, त्यात तळपणारे ऊन, शरीराची लाहीलाही आणि उरात आदिमाया भगवतीस भेटीची ओढ घेऊन लाखोंच्या संख्येने उतर महाराष्ट्रातून भाविक-भक्त सप्तशृंगगडावर पोचत आहेत.
Former Deputy Sarpanch of Saptshringgad Rajesh Gawli and family present during Panchamrit Mahapuja of Adimaya Bhagwati & Officers and employees of the trust taking Adimaye's golden ornaments to the temple in a procession.
Former Deputy Sarpanch of Saptshringgad Rajesh Gawli and family present during Panchamrit Mahapuja of Adimaya Bhagwati & Officers and employees of the trust taking Adimaye's golden ornaments to the temple in a procession.esakal

वणी : शेकडो मैलाचा प्रवास, त्यात तळपणारे ऊन, शरीराची लाहीलाही आणि उरात आदिमाया भगवतीस भेटीची ओढ घेऊन लाखोंच्या संख्येने उतर महाराष्ट्रातून भाविक-भक्त सप्तशृंगगडावर पोचत आहेत. चैत्रोत्सवाच्या आजच्या चौथ्या माळेस शनिवारी (ता. २०) सुटीची संधी साधत पाऊण लाखांवर भाविक आदिमायेचरणी नतमस्तक झाले. (Nashik More than half million devotee prostrate at saptashrungi mata feet marathi news)

चैत्रोत्सव हा ऐन उन्हाळ्यात येत असल्यामुळे पायी येणाऱ्या भाविकांसाठी धुळे, शहादा, नंदुरबार, मालेगाव, सटाणा, देवळा, कळवण आदी गावांच्या रस्त्याच्या कडेला दानशूर भाविकांनी पिण्याच्या पाण्याची सुविधा, निवारा शेड, तसेच जागोजागी रसवंतिगृह चालू केले असून, येणारे भाविक त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेत आहेत.

हजारो भाविक-भक्त सप्तशृंगगडावर दाखल झाले असून, शनिवार व रविवार सलग सुटीचे दिवस असल्याने लाखोंच्या संख्येने भाविकांचा जनसागर सप्तशृंगगडाकडे लोटत आहे. आज हजारो भाविकांनी मोठ्या श्रद्धेने आपले नवस फेडत मातेचे दर्शन घेतले. गडावर आलेले भाविक प्रथमतः शिवालय तीर्थावर जाऊन स्नान करून दर्शन रांगेसाठी मंदिराकडे मार्गक्रमण करीत होते.

आज सकाळी ट्रस्टच्या कार्यालयात आदिमायेच्या अलंकाराचे विधिवत पूजन करून डफाच्या निनादात अलंकाराची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणुकीत ट्रस्टचे जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, प्रकाश पगार, श्‍याम पवार, संतोष पाटील, विजय भवरे, यशवंत देशमुख, दिगंबर भोये, प्रकाश कनोज, संजय कराटे, मधुकर ढुमसे आदींसह भाविक सहभागी झाले होते.

आजची पंचामृत महापूजा सप्तशृंगगड ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य राजेश गवळी यांनी सपत्नीक केली. या वेळी ट्रस्टचे महाव्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, सहव्यवस्थापक भगवान नेरकर, मंदिर सहविभागप्रमुख विश्वनाथ बर्डे, पर्यंवेक्षक प्रशांत निकम, सुनील कासार, शांताराम गवळी आदी उपस्थित होते. (latest marathi news)

Former Deputy Sarpanch of Saptshringgad Rajesh Gawli and family present during Panchamrit Mahapuja of Adimaya Bhagwati & Officers and employees of the trust taking Adimaye's golden ornaments to the temple in a procession.
Nashik Lok Sabha Constituency 2024 : आजी-माजी पालकमंत्र्यांची कसोटी

दरम्यान आज न्यासाच्या प्रसादालयात भाविकांना मोफत महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. दिवसभरात सुमारे आठ हजारांवर भाविकांनी त्याचा लाभ घेतला. दरम्यान, शनिवारी कामदा एकादशीनिमित्त भाविकांच्या वतीने मंदिर गाभाऱ्यात वेगवेगळ्या रंगाची शेवंतीचे, जिप्सी, डीसबर्ड, झेंडू प्लॉवरचा वापर करून मंदिर गाभाऱ्यात आकर्षक आरास केली होती.

दरेगावचे गवळी पाटील कुटुंबीयांचा विमा

आदिमायेच्या मंदिर शिखरावर कीर्तीध्वज फडकविण्याचे सुमारे सातशे वर्षांची परंपरा असून, ध्वज फडकविण्याचा दरेगाव येथील गवळी पाटील यांना परंपरेनुसार मान आहे. ध्वज फडकविण्यासाठी गेलेला मानकरी हे ११ फुटांची काठी, तसेच शिखरावर जाताना मार्गातील देवतांची पूजा करण्यासाठी २५ ते ३० किलो वजनाचे पूजा साहित्य सोबत घेऊन फडकविण्यासाठी शिखरावर जातात.

जेव्हा ते शिखरावरून ध्वज लावून परतात तेव्हा अंगावरील वस्त्र फाटलेले असते. मात्र आजपर्यंत या मानकऱ्यांचा सुदैवाने कुठलाही अपघात झाला नसल्याचा इतिहास आहे. असे असले तरी श्री सप्तशृंग निवासिनीदेवी ट्रस्टने ध्वजाचे मानकरी दरेगावचे गवळी पाटील कुटुंबातील १५ सदस्यांच्या सुरक्षतेची जबाबदारी स्वीकारून प्रत्येक सदस्याचा पाच लाख रुपयांचा स्वतंत्र विमा काढला आहे. या निर्णयाचे दरेगावचे गवळी पाटील कुटुंबीयांसह भाविकांनी स्वागत केले आहे.

Former Deputy Sarpanch of Saptshringgad Rajesh Gawli and family present during Panchamrit Mahapuja of Adimaya Bhagwati & Officers and employees of the trust taking Adimaye's golden ornaments to the temple in a procession.
Narendra Patil : 'शिंदेंच्या पराभवासाठी पूर्ण ताकद लावणार आणि उदयनराजेंना मोठ्या मताधिक्याने निवडून देणार'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com