Saptashrungi Gad & Electric Bus esakal
नाशिक

Nashik News : सप्तश्रृंगगडासाठी ई-बसला प्रवाशांचा जोरदार प्रतिसाद! आठवड्यात 2 लाख 32 हजाराचा व्यवसाय

Nashik News : श्री सप्तश्रृंगगडावर १ एप्रिलपासून सुरू झालेल्या नाशिक ते सप्तश्रृंगीगड वातानुकूलित इ- बससेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे

सकाळ वृत्तसेवा

कळवण : श्री सप्तश्रृंगगडावर १ एप्रिलपासून सुरू झालेल्या नाशिक ते सप्तश्रृंगीगड वातानुकूलित इ- बससेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आठवड्यात ६ हजार किलोमीटरचा प्रवास होऊन २ लाख ३२ हजाराचा व्यवसाय या दोन्ही इ-बसने दिला आहे. (Nashik Strong response of passengers to E bus for Saptshringi garh news)

नाशिकहून सकाळी ५ व ५: ३०, दुपारी ११:३० व १२, सायंकाळी ६ व ६ : ३० या कालावधीत निघणाऱ्या या दोन इ-बसमधून थेट प्रवास करणाऱ्या प्रवाशास १७० रुपये भाडे आहे. या बसला दिंडोरी, वणी, नांदुरी असे थांबे देखील आहेत. दोन तास चार्जिंग केल्यावर १७५ किलोमीटरचा प्रवास होतो. दोन बस दिवसभरात परतीच्या अशा एकूण १२ फेऱ्या पूर्ण करतात.

साध्या बसने ११५ रुपयात होणारा हा प्रवास या इ-बसमध्ये १७० रुपयांत होतो. ऐन उन्हाळ्यात वातानुकूलित बससेवेमुळे प्रवाशांमध्ये समाधान असले तरी ही बससेवा अद्याप नफ्यात नाही. कारण, ठिकठिकाणी थांबा व ज्येष्ठ नागरिक व महिलांना अर्ध तिकीट तसेच ७५ च्या पुढील नागरिकांना मोफत प्रवास या सुविधा या बसला लागू आहेत. विद्यार्थ्यांना ही सेवा लागू नाही.  (latest marathi news)

सप्तश्रृंगीदेवी गड रस्ता घाट व वळणाचा आहे. मात्र याचा कुठलाही परिणाम या इ-बसवर नसून पिकअपवरही काही परिणाम नाही. ठिकठिकाणी थांब्यामुळे काही प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागतो. जर नाशिक ते गड व गड ते नाशिक असे प्रत्येक फेरीला ३५ प्रवाशी थेटचे मिळाल्यास ही बससेवा नफ्यात येऊ शकते. यंदा १६ एप्रिलपासून चैत्रोत्सव सुरू होत असल्याने बसला प्रतिसाद वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

POR vs CRO: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे स्वप्न कायम! Goncalo Ramosचा अविश्वसनीय गोल, पोर्तुगालचा नाट्यमयरित्या क्रोएशियावर विजय

POR vs CRO Live: ख्रिस्तियानो रोनाल्डोने इतिहास रचला! चेहऱ्यावरचा आनंद बरंच काही सांगून गेला, Video Viral

T20 World Cup : इंग्लंड-ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप फायनल खेळणार; दक्षिण आफ्रिकेचा उपांत्य फेरीत दारूण पराभव

Fuel Price: तेल स्वस्त झालं, पण पंपावर दर कायम! इंधनाचे भाव का कमी होत नाहीत? जाणून घ्या नेमकी कारणं...

Pune Civic Burden: माजी नगरसेवकांच्या कुटुंबीयांच्या उपचाराचा खर्च महापालिका उचलणार; पुणेकरांच्या खिशाला आणखी फटका

SCROLL FOR NEXT