Bohada: आता उलगडणार 'बोहाड्या'ची गोष्ट, गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नव्या सिनेमाची घोषणा

Bohada: बोहाडा असं या नव्या सिनेमाचं नाव असून या वेगळ्या नावाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
Bohada
Bohadaesakal

Bohada: सध्या अनेक नवनवीन सिनेमे मराठी इंडस्ट्रीत प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणारे हे सिनेमे प्रेक्षकांचही लक्ष वेधून घेत आहेत आणि आता अशाच एका वेगळ्या विषयावर भाष्य करणाऱ्या नव्या सिनेमाचं मोशन पोस्टर रिलीज करत घोषणा करण्यात आली. बोहाडा असं या नव्या सिनेमाचं नाव असून या वेगळ्या नावाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

भारतीय पुराणातील भव्य दिव्य मुखवट्यांना पूजून करायचा उत्सव म्हणजे "बोहाडा" आणि याच उत्सवाववर आधारित हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. दाक्षिणात्य निर्माता मणीगंडन मंजुनाथन 'बोहाडा'ची निर्मिती करणार आहेत. राहुल सतिश पाटील, कृतिका तुळसकर देवरूखकर सहनिर्मिती, विशाल सखाराम देवरुखकर दिग्दर्शित या चित्रपटाचे लेखन अंबर विनोद हडप यांनी केले आहे. सध्या तरी या चित्रपटात कोण कलाकार झळकणार, याबाबत अजून काहीच रिव्हील केलं नाहीये.

सिनेमाच्या पोस्टरवर वेगवेगळे मुखवटे भिंतीवर लावले असून त्यांच्या समोर बसलेला पाठमोरा मनुष्य दिसतोय. आता हा कलाकार कोण असाही प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.

सिनेमाचं दिग्दर्शक विशाल देवरुखकर या सिनेमाबद्दल सांगताना म्हणतात," निसर्गाची आपल्यावर जी कृपा आहे, त्याचे आभार मानण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो. खंत या गोष्टीची आहे की, आतापर्यंत हा उत्सव लोकांना माहित नव्हता. हा परंपरागत उत्सव आहे, त्यामुळे या रूढी, परंपरा या चित्रपटातून मांडण्याचा मी प्रयत्न केलाय. या चित्रपटाच्या माध्यमातून हा उत्सव लोकांपर्यंत पोहोचेल, अशी आशा आहे. चित्रपटाचे वेगळेपण म्हणजे निसर्गाशी संबंधित असल्याने यात मजा, सस्पेन्स, थ्रिलर यांचे मिश्रण असणार. त्यामुळे प्रेक्षकांना एक जबरदस्त अनुभव येणार आहे. वर्षात ५२ आठवडे असतात, ५२ सोंगेही असतात, जे त्यांचे अस्तित्व दाखवत असतात. परंतु याचा थांगपत्ता आपल्याला नसतो. हेच या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. या विषयाचे नावीन्यही अफाट आहे, महाराष्ट्राच्या जंगलात लपलेल्या संस्कृतीवर आधारीत चित्रपट करण्याचा मोह दाक्षिणात्य निर्मात्यांनाही आवरला नाहीये. मराठी सिने दिग्दर्शक म्हणून मला अभिमान वाटतोय की, आपल्या विषयाला दाक्षिणात्य निर्माता पसंती दर्शवत आहेत.'"

Bohada
Bohadaesakal
Bohada
Sangeet Manapman: गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सुबोध भावेनं शेअर केलं "संगीत मानापमान"चं पहिलं पोस्टर; लूकनं वेधलं लक्ष

२०२५ या नवीन वर्षात हा सिनेमा रिलीज होणार आहे. या आधी विशाल देवरुखकर यांनी बॉईज, बॉईज २, गर्ल्स या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. त्यांचे हे सिनेमे खूप गाजले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com