Ramadan Eid Attar Business : मालेगावी अत्तराचा घमघमाट! रमाजन ईदमुळे व्यवसाय बहरला

Nashik News : मालेगाव शहरात रमजान ईदची खरेदी अंतिम टप्प्यात असून बाजारात गर्दी उसळत आहे.
A customer buying perfume at a perfume shop in Malegaon
A customer buying perfume at a perfume shop in Malegaonesakal

मालेगाव : शहरात रमजान ईदची खरेदी अंतिम टप्प्यात असून बाजारात गर्दी उसळत आहे. यंत्रमाग कामगारांना कारखानदारांकडून बोनस वाटप केला जात आहे. त्यामुळे रेडीमेड कपडे खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे. कपड्यांबरोबरच येथे अत्तर, सुरमा, रुमाल, टोपी, बेल्ट आदी वस्तु खरेदी करताना नागरिक दिसत आहेत. अत्तर व टोपींच्या दुकानांवर गर्दी वाढली आहे. ही गर्दी चांदरातच्या दिवशी रात्रभर असणार आहे. अत्तराचे शेकडो प्रकार येथे विक्रीस आले आहे. (Nashik Malegaon Attar Business glow boomed due to Ramadan Eid marathi news)

बुधवारी (ता. १०) चंद्रदर्शन झाल्यास येथे गुरुवारी (ता. ११) रमजान ईदची नमाज पठण केली जाणार आहे. अवघ्या तीन दिवसावर ईद आल्याने नागरिक बाजारात धाव घेत आहेत. अत्तर, टोपी, रुमाल, बेल्ट तसेच सलूनच्या दुकानांवर गर्दी वाढली आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या टोप्या बाजारात आल्या आहेत. यात मालेगावला तयार होणाऱ्या हॅन्डमेड टोपीला मागणी आहे. येथे ३० ते १५० रुपयापर्यंत टोपी विक्री होत आहे. येथे टोपी मुंबई व भिवंडी येथून येते.

ईदला अत्तर, सुरमा लावून अनेक जण नमाज पठण करतात. अत्तरच्या सुगंधाने येथे ईदगाह मैदान व मशीद परिसर दरवळून निघतो. शहरात अत्तर विक्री करणारी दहा ते पंधरा दुकाने आहेत. या दुकानांमध्ये घाऊक अत्तर विकले जाते. अत्तराबरोबरच येथे परफ्युमचा ट्रेंड आला आहे.

युवा वर्ग परफ्युमला अधिक पसंती देत आहे. ३० रुपयापासून ते २०० रुपयांना १० ग्रॅम (तोळे) अत्तर मिळत आहे. येथे मुंबई, उत्तर प्रदेश येथील कन्नोज, दुबई येथून अत्तर येत असून या विदेशी अत्तरांना मालेगावच्या अत्तराने टक्कर दिली आहे. स्वस्तात मस्त मिळणाऱ्या या अत्तराने अनेकांना भुरळ घातली आहे. येथे सीआर ७, गुलाब, शनाया यांसह विविध अत्तर तयार केले जातात.

अत्तरांबरोबरच रुमाल व सुरमा यांचीही मागणी वाढते. सुरमा इराण येथून येतो. यात तीन प्रकार असतात. थंड, साधा, निमसुरमा असे प्रकार असून दहा ते शंभर रुपयापर्यंत विकला जातो. मोठा रुमाल मद्रास येथून येत असून ३० ते ९० रुपयाला विक्री होते.  (latest marathi news)

A customer buying perfume at a perfume shop in Malegaon
Nashik Ramadan Eid : महागाईने शिरखुर्माचा गोडवा कडवटला! बाजारातील खरेदी-विक्रीवर परिणाम, खोबऱ्याच्या दरात मात्र घसरण

अत्तराचे प्रकार

गुलाब, चमेली, मोगरा, जन्नतुल फिरदोस, मुश्‍क सफायर, शनाया, दिरहम, महायुबा, माहिर, अरबीऊद, सुफीयाना, इसरा, सिगने्चर, वजुद, अदउलहाश्‍मी, शनाया, खय्याल, गुंबदे खिजरा, संदल, पंन्टामिया, रियाजुल, जन्ना, टायटेनियम, हमसहल, वरुद, कोहतुर, कस्बा, जाफरान, मुश्‍क, खस, रुहेखस असे अत्तरांचे प्रकार आहेत. यात कन्नोज येथील रुहेखस याची उन्हाळ्यात मागणी आहे. महिलांमध्ये जेरेक, बुचीफ्लेारा, लिल सबाया, हश्‍म अलवरुद, कसबा यांना मागणी आहे.

"मालेगाव हे अत्तराचे हब बनले आहे. हिंदू-मुस्लीम बांधवही मोठ्या प्रमाणात अत्तर व परफ्युम खरेदी करतात. स्वस्तात चांगल्या दर्जाचे अत्तर मिळत असल्याने अनेकांचा कल येथे आहे. हिंदू बांधव अत्तरांपेक्षा परफ्युमला पसंती देतात."

- खिजिल अब्दुल्ला, संचालक, एसए अत्तरवाला, मालेगाव

"मालेगावचे अत्तर अशी स्वतंत्र ओळख आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या खास बनवलेल्या सुगंधी अत्तर घेण्यासाठी लोक येतात. नैसर्गिक सुगंध खूप भावतो.अत्तर बरोबर येथे तयार होणारे परफ्युम वापरतो."- वैभव सोनवणे, संचालक, रोटरी क्लब मालेगाव व्हिजन

A customer buying perfume at a perfume shop in Malegaon
Ramadan Festival : रमजान ईदनिमित्त गजबजल्या बाजारपेठा; दूध बाजार, फाळके रोडवर प्रथम बाजार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com