Salim Kutta Dance Case
Salim Kutta Dance Case esakal
नाशिक

Salim Kutta Dance Case: दहशतवादी सलिम कुत्ता डान्सप्रकरण भोवले! ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष बडगुजरांवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

Salim Kutta Dance Case : मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलिम कुत्ता याच्यासमवेत डान्सप्रकरणी उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्याविरोधात आडगाव पोलिस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस चौकशीतून सलिम कुत्तासमवेत झालेली डान्स पार्टी (Salim Kutta Dance Case) आणि त्या पार्टीला सुधाकर बडगुजर हजर असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरोधात बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधात्मक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे बडगुजर यांचे पाय आणखी खोलात गेले असून, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याने उबाठा गटाला मोठा धक्का मानला जात आहे. (Nashik Terrorist Salim Kutta dance case sudhakar Badgujar marathi news)

नागपूर येथे गेल्या डिसेंबर महिन्यात झालेल्या हिवाळी अधिवेशनात भाजप आ. नितेश राणे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात बॉम्बस्फोटातील आरोपी सलिम कुत्ता आणि ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांचा नाशिकमध्ये पार्टीतील नाचतानाचा व्हिडिओ दाखविला आणि बडगुजर यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार, नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या डिसेंबर महिन्यात बडगुजर यांची शहर गुन्हेशाखेकडून चौकशी करण्यात आली होती. सदरील चौकशीचा अहवाल आयुक्तांना प्राप्त झाला.

याप्रकरणी बडगुजर यांच्यासह सलिम कुत्ता समवेतच्या डान्स पार्टीमध्ये उपस्थित असलेल्यांविरोधात आडगाव पोलिस ठाण्यामध्ये बेकायदेशीर कृत्य केल्याचा ठपका ठेवत बडगुजर यांच्यासह सलिम कुत्ता उर्फ मोहमंद सलीम मीरा मोईद्दीन शेख याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

अडचणी वाढणार

दहशतवादी सलिम कुत्ता याच्यासमवेतची डान्स पार्टी सुधाकर बडगुजर यांच्याच आडगाव हद्दीतील हिंदुस्थाननगरमधील फार्महाऊसवर झाली होती. या पार्टीमध्ये सलिम कुत्ता हा मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी असल्याचे माहिती असूनही बडगुजर यांनी त्याची भेट घेऊन पार्टीला बोलाविले आणि भेटवस्तूही दिली होती.

ती भेटवस्तू काय होती, हे जसे गुलदस्त्यात आहे. तसेच, ही भेट का व कशासाठी झाली याचाही उलगडा झाला नसून त्याबाबत पोलीस तपास सुरू आहे. याप्रकरणी बडगुजर यांच्यासमोरील अडचणी येत्या काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे.

काय आहे प्रकरण?

सलिम कुत्ता हा १९९३च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी असून जन्मठेपेची शिक्षा भोगतो आहे. २०१६ मध्ये तो नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात असताना, मे महिन्यात तो पॅरोल रजेवर होता. पॅरोल रजा संपण्याच्या आदल्या रात्री तो सुधाकर बडगुजर यांच्या फार्महाऊसवर झालेल्या पार्टीत सहभागी झाला होता. या पार्टीमध्ये बडगुजर व सलिम कुत्ता हे दोघे ‘मैं हू डॉन...’ या गाण्यावर नाचतानाचा व्हिडिओ आ. राणे यांनी डिसेंबर २०२३ च्या हिवाळी अधिवेशनात दाखवून लक्षवेधी मांडली होती.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi Death: इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या हेलिकॉप्टर अपघातामागे षडयंत्र आहे का, नेमकं काय घडलं? इस्रायलच्या भूमिकेबाबत मोठा दावा!

Rohit Sharma : क्रिकेटपटूंची गोपनीयता जपा! ; मुंबई इंडियन्सचा खेळाडू रोहित शर्मा आयपीएल ब्रॉडकास्टरवर भडकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान

Kalyan News: देशाच्या विकासासाठी मतदार महायुतीच्याच बाजूने, विश्वनाथ भोईरांचे वक्तव्य

Akshay Kumar : अक्षयचा दिलदारपणा; जॉली एलएलबीचं शूटिंग पूर्ण होताच केली 500 मुलींना मदत

SCROLL FOR NEXT