Nashik Water Scarcity
Nashik Water Scarcity esakal
नाशिक

Nashik Water Scarcity : सिन्नर तालुक्यात टँकरच्या 40 फेऱ्या! काही गावांना 3 ते 4 दिवसांआड पाणी

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर : तालुक्यात नोव्हेंबर २०२३ मध्येही सहा टँकरच्या २१ फेऱ्या सुरू होत्या. आता टँकरची संख्या नऊ झाली असून, तीन गावे आणि ४० वाड्यावस्त्यांवर टँकरच्या ४० फेऱ्या रोज होत आहेत. गेल्या वर्षी ८ मेस धुळवड येथील रामोशीवाडीला पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू झाला होता. (Nashik Water Scarcity Sinnar taluka marathi news)

५ ऑक्टोबरला पाऊस होऊन धरणात पाणी आल्याने हा टँकर बंद झाला. मागील वर्षी पाऊस न झाल्याने काही गावे आणि वाड्यांना टँकर सुरू करण्याची वेळ प्रशासनावर आली. सिन्नर तालक्यात पावसाची सरासरी ५५६ मिलिमीटर आहे. मात्र, गेल्यावर्षी केवळ ३८८ मिलिमीटर पाऊस झाला. सरासरीच्या पाऊस केवळ ६६ टक्के होता.

त्यामुळे अनेक गावे आणि वाड्यांना टंचाईच्या झळा बसल्या. पावसाळा संपल्यावर म्हणजे दिवसाआड पाणीपुरवठा होतो, तर काही ठिकाणी तीन ते चार दिवसांआड पाणीपुरवठा होतो. तालुक्यातील अनेक मोठ्या गावांना हीच परिस्थिती आहे. अनेक गावांना दोन ते तीन दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे.

एप्रिल आणि मे महिन्यात टँकरची संख्या आणि फेऱ्यांची संख्येचा उच्चांक होण्याची शक्यता आहे. सिन्नर तालुका दुष्काळी जाहीर केल्याने पिण्याचे टँकर सुरू करण्यास प्रशासनाला फारशी अडचण येत नाही. मात्र, एप्रिल आणि मेमध्ये सिन्नर तालुक्याला टंचाईच्या झळा जास्तच बसण्याची शक्यता आहे. सध्याही अनेक गावे आणि वाड्यावस्त्यांवर टँकर सुरू करावेत, यासाठी प्रस्ताव येत आहेत. त्यामुळे टंचाईची धग यावर्षी जास्तच असणार आहे.

वीजबिल थकबाकीचे मोठे ग्रहण लागले आहे. त्यामुळे रडतखडत योजना कशाबशा चालविल्या जात आहेत. मार्च एण्डमुळे वीजबिल थकबाकी भरण्याचे मोठे दिव्य सर्व पाणीयोजनांसमोर आहे, अन्यथा या योजनेतील गावांना पाणीटंचाईचा फटका बसू शकतो. सिन्नर शहराला कडवा पाणीयोजनेसह दारणा नदीपात्रातील पळसे पंपिंग स्टेशनवरून पाणी येते. मात्र, अनेकदा अनियमित वीजपुरवठ्यामुळे सिन्नर शहरातील अनेक भागांना तीन ते चार दिवसांआड पाणीपुरवठा होतो. (Latest Marathi News)

सिन्नर तालुक्यात भोजापूर धरणातून कणकोरीसह पाच गावे, मनेगावसह १८ गावे या योजना सुरू आहेत, तर वावीसह ११ गावे, वडांगळीसह २७ गावे, बारागावपिंप्रीसह ७ गावे, नायगावसह १२ गावे आणि उंबरदरी धरणातून ठाणगावसह ५ गावे या ‘मजिप्रा’च्या पाणीयोजना राबविल्या आहेत.

दुष्काळी योजनांकडे नागरिकांच्या नजरा

यंदा केवळ ३८८ मिलिमीटर पाऊस पडल्याने सिन्नर तालुक्यातील १२८ गावांची पीक आणेवारी ५० पैशांच्या आत आली. त्यामुळे संपूर्ण सिन्नर तालुका दुष्काळी जाहीर झाला आहे. शेतकऱ्यांसह तालुकावासीयांना दुष्काळी योजनांचा फायदा केव्हा मिळणार, याकडे नजरा लागून आहेत.

"पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू नये, यासाठी प्रशासनाकडून पुरेपूर काळजी घेतली जात आहे. कोणत्याही गावांचे किंवा वाड्यांचे पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव आल्यास तातडीने प्रांताधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठविले जातात. देवपूर, फर्दापूर या गावांसह दातलीच्या काही वाड्यांचे प्रस्ताव पाठविले असून, त्यांना मंजुरी मिळेल. आलेले प्रस्ताव मंजुरीसाठी ताबडतोब पाठविले जात आहेत."-सुरेंद्र देशमुख, तहसीलदार, सिन्नर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election : प्रचाराचे वादळ थंडावले ; सातव्या टप्प्यासाठी उद्या मतदान

Kalyani Nagar Accident :भ्रष्ट चेल्यांनी बदलले तिघांचे रक्तनमुने ; ‘ससून’मधील डॉक्टरांची बनवाबनवी

Pune Accident : पुण्यात पुन्हा रॅश ड्रायव्हिंग ; बीआरटी मार्गात घुसवली मोटार

World No Tobacco Day 2024 : हृदय-फुफ्फुसांपासून ते कर्करोगापर्यंत, धूम्रपानामुळे ‘या’ गंभीर आजारांना मिळतेय आमंत्रण

World No Tobacco Day 2024: ‘तंबाखू’वर मात शक्य! हवा फक्त दृढनिश्चय; ‘आरोग्य’ विभागाकडून 2 वर्षात दीड लाखावर समुपदेशन

SCROLL FOR NEXT