NMC news esakal
नाशिक

NMC News : गोदेतील पानवेली अडविताना पालिका कर्मचाऱ्यांची दमछाक! पालिका नियोजनाचे पितळ उघड

दोन तासांची दमछाक यशस्वी झाली असली तरी पालिकेच्या नियोजनाचे पितळ मात्र उघडे पडले.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्याचे अचूक नियोजन करताना काही चुक राहू न देण्याच्या स्पष्ट सूचना होत्या.

त्या सूचनांचे पालन करताना गोदावरी नदीतील पानवेलींनी अडचण निर्माण झाल्याने एकीकडे पंतप्रधानांच्या हस्ते गोदावरी पूजन सुरु असताना दुसरीकडे गोदावरी नदीवरील पुलावरून दोर लावून पानवेली अडविण्याची कसरत कर्मचाऱ्यांना करावी लागली.

दोन तासांची दमछाक यशस्वी झाली असली तरी पालिकेच्या नियोजनाचे पितळ मात्र उघडे पडले. (NMC employees tired while blocking Panveli in Godavari river municipal planning exposed nashik)

मागील आठवड्यात पंतप्रधान मोदी नाशिक दौऱ्यावर आले होते. प्रारंभी दौऱ्यात फक्त तपोवनातील मोदी मैदानावरील जाहीर सभा एवढेच नियोजन होते.

त्यानंतर कार्यक्रम वाढत गेला. तब्बल चार तास मोदी नाशिकमध्ये होते. जाहीर सभेपूर्वी रोड शो, श्री काळाराम मंदिर दर्शन व गोदावरी घाटावर गंगापूजन हे कार्यक्रम जोडले गेले.

गोदावरी नदीचे पूजन सुरु होण्यापूर्वी नदीत वाहते व स्वच्छ पाणी राहणे आवश्‍यक होते. त्यादृष्टीने सहा तास अगोदर गंगापूर धरणातून तीनशे क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. दोन तासांनी पाण्याचा वेग दोनशे क्युसेक करण्यात आला. धरणातून पाणी वाहत असताना बापू नर्सरी पूल, जुने पंपिंग स्टेशन या भागातील पात्रातून पानवेली देखील वाहत्या पाण्याबरोबर वाहून आली.

पंतप्रधान गोदा पूजा करताना पानवेलीत उभे राहूनच पूजा होईल अशी परिस्थिती येणार होती. परंतु काही अधिकारांच्या लक्षात ही बाब समजल्यानंतर त्यांनी पानवेली थांबविण्याच्या सूचना केल्या. ऐनवेळी पानवेली नदीपात्रातून थांबविणार कशा असा प्रश्‍न निर्माण झाला.

त्याचवेळी चोपडा पूल, आनंदवली पुलावरून दोरखंड टाकून प्रवाहासोबत वाहून येणारी पानवेली थांबविण्यात यश मिळाले. दोन तासांची यशस्वी झुंज मात्र पालिका प्रशासनाचा कारभार उघड्यावर पाडणारा ठरला.

गोदावरी प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर

पानवेली हटविण्यासाठी यांत्रिकी विभागाने पाण्यात चालणारे ट्रिमर यंत्रे खरेदी केले आहेत. ट्रिमरने पानवेली का हटविली नाही. असा सवाल उपस्थित होत आहे.

पंतप्रधानांची पूजा सुरु असताना पानवेली वाहून आल्या असत्या तर गोदावरी प्रदूषणावरुन पालिका प्रशासनाला उत्तर द्यावे लागले असते. त्यामुळे ‘थोडक्यात वाचलो’ अशी प्रतिक्रिया या घटनेनंतर अधिकारी वर्गात चर्चेली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: दिवाळीआधी सोनं 7 हजारांनी स्वस्त! जळगावच्या सुवर्ण बाजारातही सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण; आजचा ताजा दर किती?

Kieron Pollard Mumbai Indians New Head Coach : ट्वेंटी-२०त १५००० धावा अन् ३४१ विकेट्स... मुंबई इंडियन्सकडून नव्या प्रशिक्षकाची घोषणा; कोण आहे जयवर्धनेचा उत्तराधिकारी?

Crime News: गँगस्टर हिमांशू भाऊ आणि नीरज फरीदपुरिया अमेरिकेत FBI कडून अटक; भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू

Latest Marathi News Live Update : दिवाळीत फटाके फोडण्यावर हायकोर्टाचे निर्बंध; नियम मोडल्यास कारवाईचा इशारा, कुठे-कुठे फटाके फोडण्यास मनाई?

Protest News: एसआयआर’ रद्द करा, ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्या; दिल्लीतील आंदोलनात आंदोलकांच्या जोरदार घोषणा

SCROLL FOR NEXT