death  esakal
नाशिक

Nashik Accident News : शिर्डी महामार्गावर अपघातात वृद्ध ठार

सकाळ वृत्तसेवा

Nashik Accident News : सिन्नर शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर मिरगाव फाटा येथे रविवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास महामार्ग ओलांडत असताना दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक देऊन केलेल्या अपघातात 56 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. (Old man killed in accident on Shirdi highway nashik accident news)

अशोक रुंजा रहाणे रा. बहादरपुर ता. राहता असे अपघातात मृत झालेल्या वृद्धाचे नाव आहे. ते बंडू सोपान रहाणे (45) यांचे सोबत प्लेटिना मोटरसायकल वरून प्रवास करत होते. शिर्डी महामार्गावर वावी-पाथरे गावांच्या दरम्यान असलेल्या मिरगाव फाट्यावर मिरगावकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडत असताना शिर्डीच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिली.

या अपघातात दुचाकी चालक अशोक रहाणे यांचा रस्त्यावर पडून डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागेवर मृत्यू झाला. तर त्यांच्या सोबत पाठीमागे बसलेले बंडू रहाणे जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळाल्यावर वावी पोलीस ठाण्यातील हवालदार दशरथ मोरे, नितीन जगताप यांनी धाव घेतली.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

पिंपरवाडी येथील टोल प्लाजा वरील रुग्णवाहिका तातडीने मदतीसाठी धावली. या रुग्णवाहिकेतून जखमी बंडू रहाणे यांना उपचारासाठी सिन्नरला हलवण्यात आले. तर टोल कंपनीच्या अन्य वाहनातून अशोक रहाणे यांचा मृतदेह सिन्नरच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. वावी पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT